SC ST United Forum Goa Dainik Gomantak
गोवा

SC ST Reservation: आरक्षणाबाबत निर्णयावरून २१ ऑगस्टला ‘भारत बंद’ची हाक; पणजीत आझाद मैदानावर धरणे आंदोलन

SC ST United Forum Goa: न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करीत देशातील दलित संघटनांकडून एकत्रित या निर्णयाविरोधात येत्या २१ ऑगस्टला ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: एससी-एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून सध्या दलित संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. या न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करीत, देशातील अनेक दलित संघटनांकडून एकत्रित या निर्णयाविरोधात येत्या २१ ऑगस्टला ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून येत्या बुधवारी पणजी येथील आझाद मैदानावर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले जाईल, असे एससी-एसटी युनाटेड फोरम-गोवातर्फे जाहीर करण्यात आले.

या फोरमने आज म्हापशात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एस. के. जाधव, सुभाष केरकर व सतीश कोरगावकर हजर होते. एस. के. जाधव म्हणाले की, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एससी व एसटी आरक्षणामध्ये उप-कोटा निश्चित करण्यास मान्यता दिली होती.

एससी व एसटी प्रवर्गातील कोणतीही जात अधिक मागासलेली आहे, असे राज्य सरकारांना वाटत असल्यास त्यासाठी उप-कोटा निश्चित केला जावू शकतो. त्याचप्रमाणे न्यायाधीशांच्या घटनापीठाने ‘क्रिमी लेयर’ बंधनकारक असले पाहिजे असेही म्हटले होते.

क्रिमी लेयरच्या खाली येणाऱ्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळू नये. त्याऐवजी त्यात समाजातील गरीबांना प्राधान्य द्यायला हवे, असे कोर्टाने म्हटले होते. मात्र, या निर्णयाला दलित संघटनांचा विरोध असल्याचे जाधव म्हणाले.

पंतप्रधानांना पाठवणार निवेदन

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अप्रभावी करण्यासाठी अध्यादेश जारी करावा. तसेच सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने पुनर्विलोकन याचिका दाखल करावी. त्याशिवाय सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जात जनगणना करावी. तसेच क्रिमी लेयर आणि कोट्यातील कोटा रद्द करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आणणे, अशा मागण्या दलित संघटनांकडून केल्या जातील. या निवेदनाच्या प्रतीवर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ती पंतप्रधान कार्यालयास पाठविली जाईल, असे सुभाष केरकर यांनी सांगितले.

‘न्यायालयाचा निर्णय संविधानविरोधी’

सुभाष केरकर म्हणाले की, या ‘भारत बंद’चा मुख्य उद्देश आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणे व तो पूर्ववत करण्याची मागणी करणे आहे. या बंदला विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा आहे. या निर्णयामुळे समाजात भेदभाव व फूट निर्माण होईल. हा निर्णय संविधानविरोधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT