Goa Minister Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोविंद गावडेंचे गच्छंती अटळ? सावर्डेकरांची गणेश गावकरांसाठी मंत्रीपदाची मागणी

Goa Politics: सावर्डे मतदारसंघातील सातही पंचायतच्या सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

Pramod Yadav

गोवा मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सभापती रमेश तवडकरांनी मंत्रीपदाबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले होते. तर, आता सावर्डेतील पंचांनी आमदार गणेश गावकरांच्या मंत्रीपदासाठी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली.

अशात गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणावरुन वादात सापडलेल्या गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सावर्डे मतदारसंघातील सातही पंचायतच्या सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. सर्वांनी आमदार डॉ. गणेश गावकर यांना मंत्रीपद देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी याबाबत विचार करण्याचे आश्वासन भेटीसाठी आलेल्या सर्व सदस्यांना दिले. सावर्डे मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून भाजपला नेहमीच मताधिक्य देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असे भेटीसाठी आलेल्या संरपंचांनी सांगितले.

सावर्डे मतदारसंघात अनेक कामे प्रलंबित आहेत यासाठी मंत्रिपदाची आवश्यकता असल्याचे उपस्थित सरपंच आणि कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

Savordem Villagers Meet Goa CM

तवडकरांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असताना, आता गणेश गावकर यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी होत आहे.

दुसरीकडे कला अकादमी नूतनीकरणचा मुद्दा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील घोटाळा, निधीचा गैरवापर, एसटी आरक्षणावरुन केलेले वक्तव्य आणि तवडकरांची झालेली शाब्दिक चकमक यावरुन गोविंद गावडे सतत वादात राहिले.

यामुळे भाजपची प्रतिमा देखील मलीन होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मंत्री गोविंद गावडे यांची गच्छंती अटळ असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, गावडेंची गच्छंती झालीच तर मंत्रिपदाची माळ गावकर की तवडकरांच्या गळात पडणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बंगळूरुतील अजब प्रकार! भररस्त्यात गादी टाकून झोपला तरुण; वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

राशीनुसार रंग परिधान केल्यानं होईल फायदा, देवी करेल मनोकामना पूर्ण; तुमचा Lucky Colour कोणता? वाचा

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये मोठी दुर्घटना; पाकिस्तानी खेळाडूमुळे पंच जखमी, चेंडू थेट डोक्यात...VIDEO VIRAL

Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

SCROLL FOR NEXT