Savarde Dainik Gomantak
गोवा

Savarde: सावर्डे ग्रामसभी तापली! निधी गैरवापरावरून गदारोळ; तासभर गोंधळ, आरोप-प्रत्यारोपाचे वातावरण

Savarde Panchayat Gramsabha: वित्त आयोगाच्या निधीतील खर्च, बेकायदेशीर बंधारा, बाक खरेदी आणि ग्रंथालय स्थापनेच्या मुद्द्यावरून सावर्डे ग्रामपंचायतीची ग्रामसभा रविवारी गाजली.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: वित्त आयोगाच्या निधीतील खर्च, बेकायदेशीर बंधारा, बाक खरेदी आणि ग्रंथालय स्थापनेच्या मुद्द्यावरून सावर्डे ग्रामपंचायतीची ग्रामसभा रविवारी गाजली. जवळपास तासभर गोंधळ, आरोप-प्रत्यारोपाच्या वातावरणात ग्रामसभेला सुरुवात झाली.

ग्रामस्थांनी सरपंच व सत्ताधारी मंडळाला चौदाव्या वित्त निधीचा गैरवापर केल्याबाबत प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी मीराबाग येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर बंधाऱ्याचा मुद्दा विशेष चर्चेत आला. ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत हा बंधारा थांबवण्याची मागणी केली.

ग्रंथालय स्थापनेबाबत सत्ताधाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण ग्रामस्थांनी फेटाळले. तर बागेतील बाक खरेदी या विषयावर ग्रामसभेत चांगलाच वाद रंगला. पंचायतीने चौदाव्या वित्त निधीतून ५२ बाक खरेदी करून नऊ वॉर्डांत वाटल्याचे सांगितले.

बांधकाम थांबवा!

संकेत भंडारी म्हणाले, भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत पंचायतचे स्पष्टीकरण अजिबात समाधानकारक नाही. मी माहिती अधिकाराअंतर्गत काही कागदपत्रांची मागणी केली असून, ती मिळाल्यानंतर पंचायत, सचिव आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT