Goa Firing Dainik Gomantak
गोवा

Sattari Crime: ..तो चालत जात होता, बाजूलाच गोळी झाडल्याचा आवाज आला; पडोसे सत्तरीत पोलिसांची चौकशी सुरु, गूढ वाढले

Sattari Padoshe Firing: या प्रकरणी वाळपई पोलिसांनी तपास सुरू करताना अनेकांची जबानी घेऊन घटनास्थळी पंचनामा केला होता. मात्र कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने प्रकरण पुढे गेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: हाऊसिंग बोर्ड पडोसे सत्तरीत गेल्या महिन्यात गोळीबारात मोहम्मद अख्तर आलम (वय ३५ वर्षे), कामगार, हा जखमी झाला होता आणि ही घटना ताजी असताना आता पुन्हा गुरुवारी रात्री त्याच ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी एअरगन काडतूस आणि एक एअरगन जप्त केली तसेच एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

यावेळी सविस्तर माहिती अशी की, गेल्या महिन्यात पडोसे सत्तरी येथे एका बिगर गोमंतकीय कामगार आपल्या काही मित्राबरोबर या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी उभे राहिले असता त्याच्या पाठीमागून कोणीतरी गोळीबार केला होता आणि त्यावेळी च्या मानेला गोळी लागून तो जखमी झाला होता. त्याला गोमेकॉत उपचारार्थ दाखल केले होते. तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या मानेतून गोळी बाहेर काढली तर त्याचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू होऊ शकतो, असे सांगितले होते.

या प्रकरणी वाळपई पोलिसांनी तपास सुरू करताना अनेकांची जबानी घेऊन घटनास्थळी पंचनामा केला होता. मात्र कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने प्रकरण पुढे गेले नाही. मात्र, गुरुवारी रात्री पुन्हा याच ठिकाणी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. गुरुवारी रात्री सुमारे ११च्या सुमारास एक स्थानिक व्यक्ती त्या मार्गावरून चालत जात असताना त्याच्या बाजूलाच गोळीबार झाल्याचा आवाज आला.

हा माणूस थोडक्यात बचावला. बचावलेल्या व्यक्तीने तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर डिचोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले व तपासणी केली. त्यावेळी त्यांना तिथे एअरगन काडतूस सापडल्या. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी १२५ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस निरिक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश गावस करत आहे.

शुक्रवारी सकाळी वाळपई पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह घटनास्थळी जाऊन तपास केला व घटनास्थळावरून एअरगन काडतूस जप्त केले. सकाळपासून त्या भागात पोलिसांची चौकशी सुरू होती. अनेकांनी दिलेल्या जबानीनंतर एका व्यक्तीला एअरगनसह चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कारवाईची मागणी

गेल्या महिन्यात जिथे गोळीबार झाला, त्या प्रकरणी गुन्हेगाराला पोलिस पकडू शकले नव्हते. त्यामुळे आतातरी पोलिसांनी कारवाई करावी, अशी ही मागणी होत आहे. पडोसे गाव सत्तरी आणि डिचोलीच्या सीमेवर असल्याने वाळपई पोलिस येथे नेहमी पोहोचू शकत नाहीत. गोळीबारप्रकरणी कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT