Sattari Farming Problems Dainik Gomantak
गोवा

Sattari: कच्ची फळे कुडतरली, काजू बिया फस्त; सत्तरीत जनावरांकडून पिकांचा फडशा; शेतकऱ्यांच्या व्यथांकडे दुर्लक्ष

Cashew farming problems: सत्तरीत सुपारी, नारळ, केळी बागायतीत उच्छाद मांडणाऱ्या प्राण्यांनी आता आपला मोर्चा आता काजू पिकाकडे वळवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: सत्तरीत सुपारी, नारळ, केळी बागायतीत उच्छाद मांडणाऱ्या प्राण्यांनी आता आपला मोर्चा आता काजू पिकाकडे वळवला आहे. त्यामुळे काजू उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे.

तालुक्यात काजू पीक हंगामाला सुरवात झाली आहे. मात्र पिकावर रानटी जनावरे ताव मारत असल्याने किती पीक मिळेल याबाबत उत्पादकांत साशंकता आहे. खेती, माकडे आदी प्राणी काजू पिकावर डल्ला मारू लागले आहेत.

कच्ची फळे देखील झाडावरच कुडतरून टाकत आहेत. तसेच काजू बियाही फस्त करीत आहेत. त्यामुळे बागायतीत काजू बियांची टरफले दिसून येत आहेत. एकीकडे नारळ, केळी, सुपारी बागायतीत उच्छाद सुरू असताना दुसरीकडे काजू बिया, बोंडू फळांवर डल्ला मारून नुकसान करीत असल्याने उत्पादक हतबल झाले आहेत.

सत्तरी तालुक्यात नगरगाव, सावर्डे, डोंगुर्ली ठाणे, म्हाऊस अशा अन्य भागात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. किंबहुना ते उत्पन्नाचे महत्त्वाचे कोरडवाहू पीक आहे. हल्लीच्या काळात बागायतदारांनी आधुनिक पद्धतीने कलमांची लागवड केली आहे.

त्यासाठी बरीच मेहनत घेतली जाते. परंतु खेती व अन्य प्राण्यांकडून बोंडू, काजू बियांवर आक्रमण केले जात असल्याने मेहनतीवर पाणी पेरण्याचे काम वन्यप्राणी करीत आहेत.

काजू पीक हंगाम सुरू झाला असून आता काजू बागायतीत खेती, माकड व अन्य वन्यप्राणी नजरेस पडत आहेत. त्यामुळे काजू बागायतदारांना त्याचा फटका बसणार आहे. खेती बोंडू फळे खाऊन बिया नष्ट करतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पीक घटले आहे.
रघू गावकर, काजू उत्पादक, सावर्डे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

SCROLL FOR NEXT