Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

मडगावात आजपासून सत्संग सोहळा

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची उपस्थिती, उद्या राज्यपालांचा सत्कार

दैनिक गोमन्तक

सासष्टी: अखिल गोमंतक श्री सिद्धारुढ सांप्रदाय प्रतिष्ठान, प्रेमभक्ती साधना केंद्र व श्री हरिमंदिर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यामाने मडगावात श्री हरिमंदिर देवस्थानात मंगळवार 3 ते 5 मे असे तीन दिवस सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण सोहळ्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री तथा अखिल गोवा श्री सिद्धारुढ सांप्रदाय प्रतिष्ठान गोवाचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या समवेत हरिमंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुहास कामत, सचिव मनोहर बोरकर उपस्थित होते.

या सत्संगादरम्यान परमश्रद्धेय वेदांतवागीश, गीतोत्तम, शिवाद्वैतभूषण सदगुरू श्री श्री डॉ. शिवकुमार महास्वामीजींचे प्रवचन तिन्ही दिवस संध्याकाळी 7.45 वाजता सुरू होईल. पहिल्या दिवशी ‘नको नको रे मना गुंतू मायाजाली’, दुसऱ्या दिवशी ‘हरि प्राप्तीसी उपाय, धरावे ते संतांचे पाय’ व तिसऱ्या दिवशी ‘हरि भक्ताविना वेळ घालवू नको रे’ या विषयांवर ते प्रवचन देतील, अशी माहिती नाईक यांनी दिली.

प्रवचन सुरू होण्यापूर्वी दरदिवशी स्वामीजींच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून उद्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष लिंडन परेरा यांचा सत्कार केला जाणार आहे.

3 मे रोजी संध्याकाळी 6.45 वाजता सदगुरु श्री श्री डॉ. शिवकुमार महास्वामीजी यांचे बिदर कर्नाटकमधून आगमन होणार असून त्यांचे भव्य स्वागत केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT