Sasashti  Dainik Gomantak
गोवा

Sasashti News : मोतिडोंगर संवेदनशील मतदान केंद्र जाहीर करण्याची मागणी

Sasashti News : त्याबद्दल तेथील लोकांनी आपल्याकडे विचारणा केली. आमच्या विरोधात तक्रार केली असा आरोप आपल्यावर केला व हल्ला केला अशी माहिती सावियो कुतिन्हो यांनी यावेळी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sasashti News :

सासष्टी, मडगाव येथील मोतिडोंगरावरील मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात यावे, अशी मागणी फातोर्डेचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली. यावेळी कॉंग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचीही उपस्थिती होती.

प्रचार करण्यासाठी मोतिडोंगर येथे गेलो असता तेथील काही लोकांनी जलील नामक व्यक्तीच्या पुढाकाराने सावियो कुतिन्हो व इतरांवर हल्ला केला व प्रचारकार्यापासून अडविण्याचा प्रयत्न केला. आपणही यावेळी उपस्थित होतो. मात्र तिथे उपस्थित केंद्रीय किंवा राज्य पोलिसांनी या लोकांना अडविण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, असे सरदेसाई यांनी तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हा एकूण गुंडगिरीचा प्रकार असून ७ मे रोजी या मतदान केंद्रावर गुंडगिरी होण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने येथील मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करावे, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी यावेळी केली.

मोतिडोंगरावर जो हल्ला झाला त्यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. तसेच मोतिडोंगर येथील हे मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करावे, यासाठी निवडणूक आयोगाला सर्व पुराव्यानिशी निवेदन दिले जाईल, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

मोतिडोंगरवरील २३७ बेकायदा घरांकडून घरपट्टी गेल्या दोन महिन्यापासून गोळा केली जाते. ही घरे बेकायदा आहेत, या घरांवर व जागेवर कसलाही अधिकारी नाही असे देखील या लोकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे व त्यांना त्याची माहिती नाही. स्थानिक आमदार त्यांना फसवत आहे हे देखील त्यांना कळत नाही, असेही सावियो कुतिन्हो यांनी यावेळी सांगितले.

या बेकायदा झोपडपट्टी बद्दलची एक याचिका उच्च न्यायालयात असल्याची माहिती कुतिन्हो यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला आमदार कादर शाह, शेख हसन मनसुख व शेख इफ्तिकार हे उपस्थित होते.

हल्ला झाल्याचा कुतिन्हो यांचा दावा

बेकायदा घरांकडुन पालिका घरपट्टी स्वीकारते त्याबद्दलची माहिती संबंधित खात्याकडून माहिती हक्क कायद्याअंतर्गत मागितली आहे.

त्याबद्दल तेथील लोकांनी आपल्याकडे विचारणा केली. आमच्या विरोधात तक्रार केली असा आरोप आपल्यावर केला व हल्ला केला अशी माहिती सावियो कुतिन्हो यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT