Agriculture  Dainik Gomantak
गोवा

Salcete: पावसाची संततधार सुरुच; सासष्टीतील शेतकऱ्यांना फटका, भाताची रोपे कुजली

Goa Monsoon 2024: फातोर्डा, राय, सुरावली, मुंगूल, बाणावली, चिंचोणे, माकाझन, बेताळभाटी, लोटली, कुडतरी या भागातील ही स्थिती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, सध्या जुलैमध्ये संततधार पाऊस पडत असल्यामुळे सासष्टीतील बहुतेक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.

काहींनी यांत्रिकी तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोपांची लागवड केली होती. ती रोपटी कुजल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जोपर्यंत शेतातून पाणी सुकत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करताही येत नाही.

काही शेतकऱ्यांनी आणखी रोपटी आणून ठेवलेलीही आहेत. पण पाऊस थांबत नाही. शेतजमिनीतून पाणी हलत नाही, अशी स्थिती झाल्याने ही रोपटीही कुजण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ही स्थिती फातोर्डा, राय, सुरावली, मुंगूल, बाणावली, चिंचोणे, माकाझन, बेताळभाटी, लोटली, कुडतरी या भागातील आहे. सासष्टीत शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याचे सासष्टी विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी सांगितले.

राय येथील मारियानो फर्नांडिस म्हणाले की, आपली ६० टक्के रोपे कुजली आहेत. शेतात पाणी असल्याने नवीन रोपे लावता येत नाहीत. सुरावलीचे माजी पंच केविन डिसोझा म्हणाले की, आपली सर्व रोपटी कुजलेली आहेत. कायतान डिसोझा म्हणाले की,एव्हाना कणसे लागायला हवी होती, मात्र तसे झालेले नाही.

यंत्राद्वारे लावलेली रोपे कुजली!

कृषी खात्यातर्फे स्थितीची पाहणी सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जमिनीची कागदपत्रे, कृषी कार्ड वगैरे जोडून नुकसान भरपाईसाठी अर्ज करणे आवश्यक आहे, असे फुर्तादो यांनी सांगितले. जी भाताची रोपटी यंत्राद्वारे लावण्यात आली त्याचे नुकसान जास्त झाले आहे. तर पारंपरिक पद्धतीने लावलेली ८० टक्के रोपट्यांना जास्त झळ पोहोचलेली नाही, असेही फुर्तादो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT