कामुर्ली: राज्यात मागील काही दिवसांपासून ग्रामसभांमधील वाद चर्चेचा विषय ठरत आहेत. सातत्याने ग्रामसभांमधील राड्याच्या घटना समोर येतायेत. हणजूण येथे संगीत महोत्सवासंदर्भात आयोजित ग्रामसभेतील धक्काबुक्कीची घटना ताजी असतानाच कामुर्ली येथूनही अशीच एक घटना समोर आली आहे.
कामुर्ली येथे आयोजित ग्रामसभेनंतर एका तरुणाने चक्क उपसरपंच संगिता पेडणेकर आणि त्यांच्या पतीला मारहाण केली. न्युबर्ट फर्नांडिस असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कोलवाळ पोलिसांनी न्युबर्ट विरोधात मारहाणप्रकरणी बीएनएस कायदा 2023 च्या कलम 115(2), 352, 74, 79, आणि 351(2) (3) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करुन अटक केली. पुढील तपास सुरु असल्याचे कोलवाळ पोलिसांकडून सांगण्यात आले.
यादरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या एकतर्फी कारवाईचा गोवा ग्रीन ब्रिगेडकडून (Goa Green Brigade) निषेध नोंदवण्यात आला. पोलिसांनी सरपंच आणि उपसरपंच यांनी दाखल केलेली तक्रारचं नोंदवून घेतली मात्र, न्युबर्टची तक्रार नोंदवून घेतली नाही, असे गोवा ग्रीन ब्रिगेडकडून सांगण्यात आले. पोलिसांनी तात्काळ न्युबर्ट याचीही सरपंच आणि उपसरपंच संगीता पेडणेकर यांच्याविरोधातील तक्रार नोंदवून घ्यावी, अशी मागणी गोवा ग्रीन ब्रिगेडकडून करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.