Sarmanas Tonca Ferry Dainik Gomantak
गोवा

Sarmanas Tonca: प्रवासी ताटकळत, वाहनांच्या रांगा, जुन्या बोटी; सारमानस-टोंक फेरीसेवा बेभरवशाची

Sarmanas Tonk Ferry: नोकरी धंद्यानिमित्त सारमानस-टोंक जलमार्गावरून दरदिवशी हजारो प्रवासी ये-जा करीत असतात

गोमन्तक डिजिटल टीम

Sarmanas Tonca Ferryboat

डिचोली: सारमानस-टोंक जलमार्गावरील फेरीसेवा बेभरवशाची बनली असून ही फेरीसेवा सुरळीत करा, अशी मागणी या जलमार्गावरून नियमित वाहतूक करणाऱ्या प्रवासीवर्गाकडून होत आहे. या जलमार्गावर वाहतूक करणाऱ्या दोन्ही फेरीबोटी जुनाट आहेत.

एखादेवेळी दोनपैकी एक जरी फेरीबोट नादुरुस्त झाली, तर प्रवासीवर्गाची मोठी गैरसोय होत आहे. प्रवासी तासन् तास ताटकळत पडतात. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागतात. इच्छित स्थळ गाठणेही प्रवाशांना अशक्य होत असते. नोकरी धंद्यानिमित्त सारमानस-टोंक जलमार्गावरून दरदिवशी हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. मात्र, या जलमार्गावरील फेरीसेवा कोलमडत असल्यामुळे प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सारमानस-टोंक जलमार्गावरून सध्या दोन फेरीबोटी वाहतूक करतात. मात्र, या दोन्ही फेरीबोटी मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या जलमार्गावरील फेरीसेवेत वारंवार व्यत्यय येत असतो. या जलमार्गावर नवीन फेरीबोटी सुरू कराव्यात. या जलमार्गावरील प्रवाशांचा वाढता आकडा लक्षात घेवून आणखी एक फेरीबोट सुरू करावी, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.

तिसऱ्या फेरीबोटीची आवश्यकता

सारमानस-टोंक जलमार्गावर वाहतूक करणाऱ्या दोन्ही फेरीबोटी जुन्या आहेत. त्यामुळे फेरीबोटी नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असतात. या जलमार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या जलमार्गावर तिसऱ्या फेरीबोटीची आवश्यकता आहे. तिसरी फेरीबोट सोडावी, तसेच सध्याची फेरीसेवा सुरळीत करावी, अशी मागणी पिळगावचे माजी सरपंच महेश वळवईकर यांनी केली आहे.

सारमानस-टोंक जलमार्गावर नवीन फेरीबोटी सुरू करा अशी मागणी करून काही वर्षांपूर्वी नदी परिवहन खात्याला तसा प्रस्ताव दिला आहे. मात्र, या प्रस्तावाकडे अजून दुर्लक्षच झाले आहे. संबंधित खात्याने या प्रस्तावाचा विचार करावा.
अनिल नाईक, माजी सरपंच, पिळगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT