Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Ferry Boat: ‘पिळगाव-आमोणे पुलानंतर सारमानस फेरीबोट बंद’

Ferry Boat: पिळगाव - आमोणे मार्गावर पूल बांधण्यात येईल. त्यानंतर सारमानस माशेल जलमार्गावरील फेरीबोट सेवा बंद ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

दैनिक गोमन्तक

Ferry Boat: पिळगाव - आमोणे मार्गावर पूल बांधण्यात येईल. त्यानंतर सारमानस माशेल जलमार्गावरील फेरीबोट सेवा बंद ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले. सारमानस येथील फेरीबोट धक्का रुंदीकरण जागेअभावी शक्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता. ते म्हणाले, सारमानस - माशेल जलमार्गावर फेरीबोट धक्का अरुंद आहे. तेथे एक कार पाण्यात गेली होती. धक्का अरुंद आणि तीव्र उतार असल्याने तेथे प्रवास करणे जिकिरीचे असते.

मुख्यमंत्री म्हणाले, मी त्या जलमार्गावरून कधीतरी प्रवास करतो. तीव्र उतार व अरुंद धक्क्याची कल्पना आहे. ब्रेकवरील पाय जरा निसटला तर अपघात झालाच म्हणून समजा. याला मार्ग म्हणून पिळगाव - आमोणे पूल बांधता येईल, तो पूल झाला की फेरीबोट सेवा बंद करावी लागेल.

फेरीबोट सेवा सरकारला परवडत नाही. सारमानसच्या जनतेला आमोण्यात जाण्यासाठी पिळगावला येऊन जावे लागणार आहे. पूल झाल्यावर फेरीबोटही सुरू ठेवा ही मागणी मान्य करता येणार नाही.

पुलासाठी एका बाजूने २०० मीटर, तर दुसऱ्या बाजूने ६०० मीटर जागा जोड रस्त्यांसाठी संपादीत करावी लागणार आहे. जागेअभावी धक्का दुरुस्त करणे किंवा उतार कमी करणे शक्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT