Punch Anil showing the crumbling concrete  Dainik Gomantak
गोवा

सारमानस फेरीधक्का बनतोय कमकुवत

काँक्रीट उखडतेय, पावसाळ्यापूर्वी डागडुजी करा, प्रवाशांना अडचण

दैनिक गोमन्तक

डिचोली: सारमानस-टोंक जलमार्गावरील सारमानसच्या बाजूचा फेरीधक्का दिवसेंदिवस कमकुवत होत चालला असून, त्याची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करावी, अशी मागणी या जलमार्गावरून नियमित प्रवास करणारे वाहनचालक आणि अन्य प्रवाशांकडून होत आहे. सारमानस-टोंक जलमार्गावरून दुचाकी आणि चारचाकी मिळून रोज शेकडो वाहने ये-जा करतात. माशेल, फोंडा, पणजी आदी भागात जाणारे कामगार आणि इतर नियमित प्रवाशांचाही आकडा मोठा असतो. सारमानस फेरीधक्का हा पिळगाव पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत आहे.

फेरीधक्का कमकुवत

सारमानसच्या बाजूच्या फेरीधक्क्याचे काँक्रीट उखडत असून, हा फेरीधक्का कमकुवत होत चालला आहे. काही ठिकाणी लोखंडी सळ्या वरती आलेल्या आहेत. ओहोटीच्यावेळी या फेरीधक्क्याची सध्याची स्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे. आठ वर्षांपूर्वी नदी परिवहन खात्याकडून या फेरीधक्क्याचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर फेरीधक्क्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे. सारमानस येथे फेरीबोटीतून वाहने बाहेर काढतानाच चढण आहे. त्यामुळे वाहनचालकांची कसरत होत असते. त्यातच फेरीधक्का कमकुवत होत असल्याने समस्या निर्माण होत आहेत. एखादेवेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT