Football Dainik Gomantak
गोवा

Santosh Trophy: गतउपविजेता गोवा संघ साखळी फेरीतच गारद ; दिल्लीने रोखले गोलशून्य बरोबरीत

Santosh Trophy 2024-25: संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतील पाच वेळच्या माजी विजेत्या आणि गतउपविजेत्या गोव्यावर यंदा साखळी फेरीतच गारद होण्याची वेळ आली

गोमन्तक डिजिटल टीम

Santosh Trophy 2024-25 Football Goa VS Delhi

पणजी: संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतील पाच वेळच्या माजी विजेत्या आणि गतउपविजेत्या गोव्यावर यंदा साखळी फेरीतच गारद होण्याची वेळ आली. ब गटातील अखेरच्या साखळी फेरी लढतीत त्यांना दिल्लीने गोलशून्य बरोबरीत रोखले.

हैदराबादमधील डेक्कन अरेनावर मंगळवारी रात्री झालेल्या लढतीत गोव्यासाठी विजय अत्यावश्यक होता; पण त्यांना पूर्ण तीन गुण प्राप्त करणे शक्य झाले नाही. ८९व्या मिनिटास दिल्लीच्या मिलिंद नेगी याला रेड कार्ड दाखविले. प्रतिस्पर्ध्यांचा एक खेळाडू कमी झाल्याचा लाभही नंतर गोव्याला उठवता आला नाही. या गटातील अगोदरच्या लढतीत ओडिशाने मेघालयास गोलशून्य बरोबरीत, तर केरळने तमिळनाडूस १-१ असे गोलबरोबरीत रोखले होते.

ब गट साखळी फेरीतील सर्व संघांची मोहीम संपली. प्रत्येकी पाच सामने खेळल्यानंतर केरळचे सर्वाधिक १३, मेघालयाचे ८, दिल्लीचे ७, तर ओडिशाचे ५ गुण झाले. हे चारही संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. गोवा (४ गुण) व तमिळनाडू (३ गुण) या संघांना स्पर्धेत आगेकूच राखता आली नाही. एकंदरीत गोव्याने एक विजय, एक बरोबरी व तीन पराभव अशी कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT