santinez  Dainik Gomantak
गोवा

Santinez News : गटारातून घाण पाणी रस्त्यावर; सांतिनेजमधील प्रकार

रविवार असल्याने कोणीही या घटनेची दखल घेतलेली नाही. परिसरातील नागरिकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

Santinez News : पणजी, सांतिनेज येथील हॉटेल शितलजवळील गटारातून घाण पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. ज्या बाजूने पाणी रस्त्यावर आले आहे, त्याच बाजूने सध्या गटाराचे काम सूरू आहे.

रविवार असल्याने कोणीही या घटनेची दखल घेतलेली नाही. परिसरातील नागरिकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागला.

सांतिनेज मधील हमारा स्कूलजवळील वाय आकाराच्या रस्ता मार्ग असलेल्या ठिकाणी हॉटेल शितलजवळ घाणपाणी रस्त्यावर येत होते. सध्या हा परिसर विविध समस्यांमुळे गाजत आहे. अगोदरच या भागात सुरू असलेल्या कामांमुळे धुळीचा त्रास होत आहे.

दुचाकीस्वारांना आणि रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांन याबबत प्रचंड नाराज आहेत. गटारासाठी चर खोदकाम करण्यात आले आहे, परंतु ते काम गतीने पुढे जात नाही, अशी स्थिती आहे.

शितल हॉटेलजवळील वाय आकाराच्या मार्गावर मध्यभागी काही दिवसांपूर्वी मलनिस्सारणाच्या वाहिनी टाकण्याच्या कामामुळे झालेल्या खोदकामाचा वाहनधाराकांना बराच त्रास झाला होता.

याशिवाय अजूनही या मार्गावरील खड्डे व्यवस्थितरित्या बुजवलेले नाहीत. काही आठवड्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासानाने शितल हॉटेलवर कारवाई केली होती. आता गटारातून रस्त्यावर येणारे घाण पाणी नक्की कोणाचे आहे, हे महानगरपालिकेला शोधावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT