ED Action on 'Sanskar Group' | Sanskar Group News
ED Action on 'Sanskar Group' | Sanskar Group News Dainik Gomantak
गोवा

‘संस्कार ग्रुप’ची 24 कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

दैनिक गोमन्तक

पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉंडरिगप्रकरणी मे. संस्कार ग्रुपच्या भागिदारांची सुमारे 24.39 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये जंगम व स्थावर मालमत्ता व ठेव रक्कमेचा समावेश आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यानी दिली.

मनिषा शर्मा, नवीन बेरी (मे. लावण्य ट्रव्हल्स) व अरविंद छड्डा हे मे. संस्कार ग्रुपचे भागीदार आहेत. लोकांना बंगले देण्याचे आश्‍वासन देऊन त्यांच्याकडून रक्कम घेतल्या व त्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी राज्यातील पोलिस स्थानकात नोंद आहेत. या तक्रारीनुसार ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

ईडीने जंगम व स्थावर मालमत्ता जप्त केली आहे त्यामध्ये गोव्यातील या ग्रुपचे फ्लॅटस् व व्हिला तसेच दिल्ली व फरिदाबाद येथील मालमत्ता व ठेव रक्कमांचा समावेश आहे. या तिघांनी मे. संस्कार ग्रुपने विकसित केलेल्या हणजूण येथे बंजारा हिल्स प्रकल्पात बंगले बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते. अनेकांनी त्यासाठी रक्कमा गुंतविल्या होत्या मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या.

ईडीने केलेल्या चौकशीत मनिष शर्मा याने विक्री करार व विक्री खत उपनिबंधकांकडे केले असल्याचे बंगले खरेदीदारांना दाखविले होते व विकसित केलेल्या प्रकल्पात वेळेमध्ये बंगले व फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले होते. या प्रकल्पाचे काम 60 ते 70 टक्के पूर्ण झाले होते तेव्हा मनिष शर्मा व नवीन बेरी या दोघानी बँक व्यवस्थापकाशी कटकारस्थान रचून पणजी येथील जम्मू व काश्‍मीर बँकेत खोटे कागदपत्रे सादर करून हा प्रकल्प गहाण ठेवून त्याच्यावर 20 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यानंतर ही कर्जाची रक्कम त्यांनी तिघांच्या बँक खात्यावर जमा केली होती व त्यांनी ती स्वतःसाठी वापरली होती. त्यांच्या खात्यावरील रक्कम बँकेने एनपीए घोषित केली व याप्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT