Goa News|Beating Dainik Gomantak
गोवा

Goa News: साखळीत नगराध्‍यक्ष-मुख्‍याधिकारी बाचाबाची; परस्‍पर विरोधी तक्रारी पोलिसांत दाखल

भाजपच्‍या छोटेखानी सभेत बॅनर लावण्‍याच्‍या मुद्यावरून काल साखळी पालिकेचे मुख्‍याधिकारी कबीर शिरगावकर व नगराध्‍यक्ष राजेश सावळ यांच्‍यात बाचाबाची झाली.

दैनिक गोमन्तक

Goa News: भाजपच्‍या छोटेखानी सभेत बॅनर लावण्‍याच्‍या मुद्यावरून काल साखळी पालिकेचे मुख्‍याधिकारी कबीर शिरगावकर व नगराध्‍यक्ष राजेश सावळ यांच्‍यात बाचाबाची झाली. त्‍याचे पर्यावसान झटापटीत झाले. अशा परस्‍पर विरोधी तक्रारी पोलिसांत दाखल करण्‍यात आल्‍या आहेत. शिरगावकर यांनी आपल्‍याला ढकलल्‍याचा आरोप सावळ यांनी केला आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून मुख्‍याधिकारी आणि नगराध्‍यक्ष यांच्‍यात सुसंवाद नव्‍हता. म्‍हादई बचावार्थ साखळी येथे सभेला मुख्‍याधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्‍यानंतर त्‍याला प्रारंभ झाला. दरम्‍यान, काँग्रेसने या प्रकारणी टीका केली आहे.

साखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष राजेश सावळ यांना ‘प्रश्‍न का विचारला?’ म्हणून त्यांच्याच केबिनमध्ये मारहाण केली. अशाप्रकारे लोकप्रतिनिधीला सरकारी अधिकाऱ्याकडून मारहाण होण्याची राज्यातील पहिलीच घटना असून, ती देखील मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात घडत आहे.

ही बाब अत्यंत लाजीरवाणी असून, संबंधितांवर नगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार प्रताप गावस यांनी पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस भवनात झालेल्या या परिषदेस उत्तर गोवा जिल्हाधिकारी विरेश शिरोडकर आणि काँग्रेसचे साखळी गट प्रमुख मंगलदास नाईक यांची उपस्थिती होती.

गावस म्हणाले, आजची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, तो प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून असल्यासारखेच आहे. या मुख्याधिकाऱ्यास ताबडतोब निलंबित करायला हवे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे सतत वादग्रस्त ठरत आहेत.

आरोप काय?

पोस्टर लावल्यानंतर संबंधिताकडून महसूल येणे आवश्‍यक आहे, त्यामुळे त्याविषयीच्या फाईलवर नगराध्यक्षांनी नोट घातली होती. त्यात महसूल नसेल तर पोस्टर कशासाठी लावण्यास परवानगी दिली?, अशी विचारणा सावळ यांनी मुख्याधिकारी शिरगावकर यांना बोलावून केली. त्याचा राग अनावर झाल्याने शिरगावकरांनी सावळ यांना मारहाण केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

खरी कुजबूज: तिकीट अन् राजकीय चर्चा..!

US Shopping Mall Shooting: अमेरिकेत शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार Watch Video

SCROLL FOR NEXT