Sanjivani Sugar Factory Protestors arrested Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: संजीवनी कारखान्यासाठी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न; 200 हून अधिक आंदोलक शेतकरी ताब्यात

विविध मागण्यांसाठी आंदोलन

Akshay Nirmale

Sanjivani Sugar Factory Protestors arrested: संजीवनी सहकारी साखर कारखान्याबाबत विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज, सोमवारी दुपारी महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पुर्वी सकाळी कारखान्याच्या गेटवर ऊस उत्पादकांनी आंदोलन केले होते. तेव्हाच दुपारी महामार्ग रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दुपारी आंदोलक महामार्गावर जमू लागल्यानंतर पोलिसांनी वाहतुकीस अडतळा होऊ नये, यास्तव आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. सर्व आंदोलकांना कुळे पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. सुमारे 200 हून अधिक शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.

धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना पूर्ववत सुरू करावा, ऊस शेतीला प्राधान्य द्यावे आमि ऊस उत्पादकांची नुकसान भरपाई वेळेत द्यावी, या मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज संप पुकारला होता. यावेळी संजीवनी साखर कारखान्याच्या गेटसमोर जमावाने धरणे आंदोलनाला सुरवात केली.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला. इथेनॉल प्रकल्प होणार की नाही हे सरकारने लेखी स्वरूपात दिले पाहिजे, असा इशारा देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT