Sanjay School Porvorim Dainik Gomantak
गोवा

Sanjay School Porvorim: संजय स्कूलमधील 'त्या' दिव्यांग विद्यार्थ्याला सरकारने 50 लाख नुकसानभरपाई द्यावी; DRAG ची मागणी

संबंधित विद्यार्थी व्यावसायिक विद्यार्थी शिक्षण विभागाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आधार सुविधा केंद्रात गेला असता अपघात

Kavya Powar

Disabled Student Accident: काही दिवसांपूर्वी पर्वरी येथे असलेल्या संजय विशेष मुलांच्या शाळेत दुसऱ्या मजल्यावरून पडून एक दिव्यांग जखमी झाल्याची घटना घडली होती. यानंतर ती इमारत जुनी असून सरकारचे लक्षच नसल्याचे नमूद करण्यात आले. आता जखमीला सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी DRAG तर्फे करण्यात आली आहे.

पर्वरी येथील जुन्या एससीईआरटी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मणक्याला गंभीर दुखापत झालेल्या संजय स्कूलच्या विद्यार्थ्याला सरकारने 50 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गोवा दिव्यांग अधिकार संघटना (DRAG)चे अध्यक्ष अॅव्हेलिनो डी सा यांनी केली आहे.

संबंधित विद्यार्थी व्यावसायिक विद्यार्थी शिक्षण विभागाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आधार सुविधा केंद्रात गेला होता. तेव्हा त्याचा हा अपघात झाला. पर्वरी येथील जुन्या ‘एससीईआरटी’ची इमारत धोकादायक असल्याने तेथील व्यावसायिक केंद्र तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संजय केंद्र स्थलांतर करण्याची शिफारस आठ महिन्यांपूर्वीच केली होती. मात्र याबाबत पुढे काहीच झाले नाही. परिणामी, यामध्ये एकाचा अपघात घडला.

DRAG ने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने पणजीत 21 इमारती सुलभ करण्यासाठी 8 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. पण कोणत्याही इमारतीत एकही प्रवेशयोग्य शौचालय किंवा कार पार्किंग नाही. त्यामुळे सरकारच्या चुकीमुळेच हे घडले असून, सरकारतर्फे पिडीताला 50 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असा दावा करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT