Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Drowning Death: भावासाठी जीवाची बाजी लावूनही बहिणीचा अंत, कुडचडेत शोककळा; समुद्राने हिरावले दोन निष्पाप जीव

Sanika Sanjay Naik drowning: भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणाऱ्या सानिका संजय नाईक (१७) हिलाही अखेर मृत्यूने गाठले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव/केपे: भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणाऱ्या सानिका संजय नाईक (१७) हिलाही अखेर मृत्यूने गाठले. काल बुडालेला श्लोक नाईक (११) या तिच्या लहान भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. आज सकाळी गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असताना सानिकानेही अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे कुडचडे येथील नाईक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी सकाळी दक्षिण गोव्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी संजय नाईक यांची पत्नी आपली तिन्ही मुले व बहिणीसह खणगिणी-बेतुल येथील समुद्रकिनाऱ्यावर गेली होती.

आंघोळीनंतर दुपारच्या सुमारास श्लोक पुन्हा पाण्यात उतरला. मात्र, अचानक आलेल्या जोरदार लाटेत तो वाहून गेला. हे पाहताच त्याची मोठी बहीण सानिका धावत पाण्यात उतरली. भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या प्रचंड लाटेने दोघांनाही आपल्‍या कवेत घेतले.

आईवर दु:खाचा डोंगर

आपल्या डोळ्यादेखत दोन लेकरं गमावल्याने आईला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्‍यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबावर कोसळलेले हे दु:ख संपूर्ण गावाला अस्वस्थ करून गेले आहे.

काल दुपारी अडीच वाजता बहीण-भावाचा मृतदेह घरी आणताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांतही अश्रू दाटले. संध्याकाळी साडेचार वाजता कुडचडे स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीड वर्षाचा चिमुकला झाला पोरका

संजय नाईक यांना तीन मुले. कालच्‍या दुर्घटनेत श्‍‍लोक व सानिका या आपल्‍या दोन मुलांना नाईक यांनी गमावले. ते एका फार्मसीत कामाला आहेत. त्‍यांना आणखी एक दीड वर्षाचा मुलगा आहे.

१५ मिनिटांचा संघर्ष

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने गंभीर अवस्‍थेत सानिकाला पाण्‍याबाहेर काढले. तिने धापा टाकत भावाचा उल्लेख करताच शोधमोहीम सुरू झाली. सुमारे १५ मिनिटांनी श्लोकला बाहेर काढून बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गंभीर अवस्थेतील सानिकाला गोमेकॉमध्ये हलवण्यात आले होते. पण आज तिचीही प्राणज्‍योत मालवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT