goa police
goa police  
गोवा

भारतातील सर्वोत्तम परफॉरर्मन्स असणाऱ्या पोलिस ठाण्यांच्या यादीत 'सांगे पोलिस स्टेशन'ला ५वे स्थान

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी- दक्षिण गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रमुख 10 पोलिस ठाण्यांपैकी 5व्या स्थानी सांगे तालुक्यातील पोलिस ठाण्याची वर्णी लागली आहे.

भारत सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत मणिपूरच्या थोबालमधील नोंगपोक सेकमाई या पोलिस ठाण्याला देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान मिळाले आहे. तर दुसऱ्य़ा, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे तमिळनाडू, अरूणाचल प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील पोलिस ठाण्यांचा हा बहुमान मिळाला आहे.

 भारत सरकारने आज देशातील 10 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्यांची यादी प्रसिद्ध केली. या पुरस्कांरासाठी 2015मध्ये गुजरातमधील कच्छ येथून पंतप्रधान मोदींनी पोलिस महासंचालकांच्या परिषदेत केलेल्या निर्देशांच्या निकष लावण्यात आला आहे. सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार 2020मध्ये कोरोना सारख्या परिस्थितीतही गृह मंत्रालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले. यातून निवडण्यात आलेले सर्वाधिक पोलिस ठाणे हे निमशहर तसेच ग्रामीण भागातील होते, असे गृह मंत्री अमित शहांनीही म्हटले असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यातून शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या पहिल्या 10 पोलिस ठाण्यांची अखेर निवड करण्यात आली असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.    
 
2020मधील  पहिल्या 10 उत्कृष्ट कामगिरी नोंदवणाऱ्या पोलिस ठाणे हे आहेत- 

1 नोंगपोक सेकमाई (थोबाल, मणिपूर) 
2 सुरंमंगलम (सालेम, तमिळनाडू)
3 खारसंग (चांगलांग, अरूणाचल प्रदेश) 
4 झिलमिली (सुरजपूर, छत्तीसगढ) 
5 सांगे (दक्षिण गोवा, गोवा) 
6 कालिघाट (उत्तर-मध्य अंदमान, अंदमान आणि निकोबार बेट) 
7 पाक्योंग (पूर्व जिल्हा, सिक्कीम) 
8 कंठ (मोरादाबाद, उत्तर प्रदेश) 
9 खानवेल (दादरा आणि नगर हवेली, दादरा आणि नगर हवेली) 
10 जम्मिकुंटा तालुका ( करीमनगर, तेलंगाणा) 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT