Shivani Boinavar death in Sanguem Goa Dainik Gomantak
गोवा

Shivani Boinavar Death: चक्कर येऊन पडली, रुग्णवाहिका आलीच नाही? 22 वर्षीय शिवानीचा मृत्यू, सांगेत संताप

108 ambulance delay after woman's death in Goa: बेंडवाडा-सांगे येथील २२ वर्षीय शिवानी बोईणावर ही तरुणी चक्कर येऊन पडली असता, वेळीच १०८ रुग्णवाहिका न आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा ठपका सांगेवासीयांनी ठेवला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सांगे: बेंडवाडा-सांगे येथील २२ वर्षीय शिवानी बोईणावर ही तरुणी चक्कर येऊन पडली असता, वेळीच १०८ रुग्णवाहिका न आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा ठपका सांगेवासीयांनी ठेवला आहे. आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा बळी गेल्याचा आरोप करत स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

सविस्तर माहिती अशी, की बेंडवाडा-सांगे येथील शिवानी बोईणावर (वय २२ वर्षे) ही तरुणी आज सकाळी ११ वाजता चहा पिऊन दसऱ्यानिमित्त मंदिरात जाण्यासाठी निघाली असता अचानक चक्कर येऊन पडली. शेजाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता ती वेळेत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शिवानी किमान पाऊणतास घरातच पडून होती. अखेर खासगी वाहनाने तिला सांगे आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शिवानीला मृतावस्थेत आरोग्य केंद्रात आणले, तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार १०८ रुग्णवाहिका वेळेत आली नसल्याने शिवानीचा मृत्यू झाला. तरुणीचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे स्थानिक मोठ्या संख्येने आरोग्य केंद्रात जमा होऊ लागले. याच गडबडीत सांगे पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात पाठविला.

या प्रकारामुळे जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून माजी नगरसेवक मेशू डिकॉस्ता, फौजिया शेख, प्रीती नाईक, सत्यवान गावकर, जितेंद्र नाईक यांनी उद्या (बुधवारी) सकाळी नऊ वाजता सांगे आरोग्य केंद्रात जमून आरोग्य केंद्र प्रशासनाला जाब विचारण्याचे निश्‍चित केले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवानीचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे कारण उत्तरीय तपासणीचा अहवाल उद्या आल्यावर समजणार आहे. येथील आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका सेवा विस्कळित आहे. डायलिसिस केले जात नाही. एक्स-रे दररोज काढला जात नाही, शिवाय वेळेवर औषधे-इंजेक्शन दिले जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

रुग्णवाहिकेसह चालक जिल्हा इस्पितळात

यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना रुग्णवाहिकेविषयी विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. स्थानिक युवक म्हणाले, की आम्ही ‘१०८’शी संपर्क साधला असता एक गाडी दुरुस्तीसाठी पाठविली असून दुसरी गाडी इतर ठिकाणी कॉलवर गेल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात सांगे आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका घेऊन चालक जिल्हा इस्पितळात गेल्याचे समजले. १०८ रुग्णवाहिकेशी कॉल केला असता, संध्याकाळी चारपर्यंत संबंधितांनी दाद दिली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आज सर्वपक्षीय एकवटणार

यापुढे असा गैरप्रकार घडू नये, यासाठी सांगेतील सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन उद्या (बुधवारी) सकाळी नऊ वाजता हॉस्पिटल प्रशासनाला जाग आणण्यासाठी एकत्र येण्याची हाक दिली आहे.

Panaji Theft Case: पणजीत चोरट्यांचा धुमाकूळ! पार्क केलेल्या कारची काच फोडून 'इतक्या' हजारांच्या रोकडसह PMLA खटल्यांचे पुरावे लंपास

Electric Scooter Fire Betim: चार्जिंगला लावलेली ईव्ही दुचाकी अचानक पेटली; कार आणि बुलेटचेही लाखोंचे नुकसान!

SBI Cyber Attack: देशातील सर्वात मोठ्या बँकेवर सायबर हल्ला! 3897 ग्राहकांचा प्रायव्हेट डेटा डार्क वेबवर लीक; तुमचा डेटा सुरक्षित आहे का?

Goa Pharma Export Hub: गोवा बनणार औषध निर्यातीचे नवे केंद्र? मोपा-दाबोळी विमानतळांवर मोठी तयारी!

Congress Rakhan Yatra: काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून काय साध्य झाले? 27 दिवसांच्या प्रवासानंतरही अनुत्तरित प्रश्न कायम

SCROLL FOR NEXT