Fish Market Dainik Gomantak
गोवा

सांगेत सुकी मासळीविक्रेते गोंधळात!

ऐनवेळी जागेत बदल : पुरुमेंत फेस्‍त एक दिवसावर; पालिकाही ठाम

दैनिक गोमन्तक

सांगे : येथील प्रसिद्ध पुरुमेंताच्‍या फेस्‍तात सुकी मासळीविक्रेत्यांच्या जागेत पालिकेने यंदा बदल करण्याचा निर्णय घेतल्याने या विक्रेत्‍यांमध्‍ये गोंधळ उडाला असून त्‍यांनी तीव्र नाराजी व्‍यक्त केली आहे. आम्हाला पूर्वीच्याच जागी मासळीविक्री करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी त्‍यांनी केली आहे, तर, पालिका मंडळाने सर्व विचाराअंती जागेत बदल केल्याचे स्पष्ट केले आहे. फेरीला अवघा एक दिवस शिल्लक असताना सांगे बाजरात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

याबाबत मासळीविक्रेत्यांची बैठक पालिका मंडळासमवेत झाली, पण योग्य तोडगा निघाला नाही. पालिकेच्या म्हणण्यानुसार, पालिका सभागृह सलग तीन दिवस बुकिंग असल्यामुळे पालिका पायथ्याशी थाटणाऱ्या दुकानांमुळे गर्दी होईल. शिवाय सुकी मासळीविक्री रस्त्यावर होत असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होणार आहे. या सर्व विक्रेत्यांना यंदा बुधवारचा बाजार भरतो, त्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगे नगराध्यक्ष श्‍‍वेता तारी यांनी सांगितले.

दरम्‍यान, उपनगराध्यक्ष कॅरोझ क्रुझ म्हणाले की, सर्व मासळी विक्रेत्‍यांचे एकाच ठिकाणी स्थलांतर केले तर विक्रीला काही अडचण निर्माण होणार नाही.

मासळीविक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार पालिका मंडळाने मासळीविक्री करण्याच्या जागेत बदल करण्याचा निर्णय आधीच घेतला असता तर आम्ही मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी केलीच नसती. मासळी खरेदी-विक्रीसाठी बुधवार बाजाराची जागा अपुरी पडणार असल्याचा प्रतिक्रिया व्यक्त करून यंदाच्या वर्षी आम्हाला दरवर्षीच्या जागीच मासळीविक्रीसाठी परवानगी देण्याच्या मागणीवर मासळी विक्रेते ठाम आहेत. त्‍यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT