Sange Palika is in financial difficulties
Sange Palika is in financial difficulties 
गोवा

सांगे पालिका आर्थिक अडचणीत

गोमंतक वृत्तसेवा

सांगे : सांगे नगरपालिका ही सर्वात जुनी नगरपालिका आहे. पालिका अस्तित्वात येण्यापूर्वी पोर्तुगीज काळात ‘काम्र’ म्हूणन कारभार हाताळला जात असे. अजूनही सांगेतील मार्केटवर'' काम्र द मेरकॅदो’ म्हणजे पालिकेचे व्यापारी संकुल म्हूणन खुणा आहेत. गोवा मुक्तीनंतर सांगे पालिका अस्तित्वात आली त्याकाळी सरकार नियुक्त पालिका कारभार हाताळण्यासाठी पालिका मंडळ नेमण्यात आले आणि नंतर पालिका निवडणूक घेण्यात आली. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यासंदर्भात सांगे पालिकेकडे सविस्तर माहिती उपलब्ध नाही. 

पहिल्या निवडणुकीत कोण निवडून आले, कोण किती काळ नगराध्यक्षपदी राहिले, पहिले नगराध्यक्ष कोण, त्यात महिला किती नगराध्यक्ष होऊन गेल्या याची कोणतीच माहिती सध्या सांगे पालिकेत नाही. १९९५ पासूनची यादी पालिकेत आहे. त्यामुळे लोकांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार नेल्सन डायस हे निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष होते. त्यानंतर कोण नगराध्यक्ष बनला ही पालिकेत माहिती उपलब्ध नसली तरी मेनगेलीन डी कोस्ता हे नगराध्यक्ष झाले आणि सर्वाधिक काळ नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांनाच मिळाला आहे. त्यानंतर पाच वर्ष पूर्ण करणारा नगराध्यक्ष सांगे पालिकेला आजपर्यंत पाहायला मिळाला नाही. सतत ठरवून खेळल्या जाणाऱ्या संगीत खुर्चीचाच खेळ सुरू आहे. यामुळे नगराध्यक्ष होण्याचा मान मिळतोय, पण विकास कामे पूर्ण झाल्याचे समाधान मात्र मिळत नाही.


सांगे ही ‘क’ दर्जाची पालिका. विकास कामे, बांधकाम किंवा मोठे प्रकल्प नसल्याने निधी उत्पन्न होत नाही. घरपट्टी किंवा सामान्य स्वरूपात मिळणाऱ्या करावर पालिकेचा कारभार चालविला जात आहे. मात्र, आताची पालिका इमारत पाहता सांगे पालिका श्रीमंत वाटत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. कर्मचाऱ्यांना कधी दोन महिन्यांनंतर, तर कधी तीन महिन्यांनंतर वेतन देण्यात येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT