Sandip Nigalye Priol Dainik Gomantak
गोवा

संदीप निगळ्‍ये अपक्ष निवडणूक लढवणार

गावडेंच्‍या प्रवेशानंतर प्रियोळ भाजप कार्यकर्त्यांचा राजीनामा

दैनिक गोमन्तक

फोंडा : प्रियोळ मतदारसंघात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी करूनही वरिष्ठ नेत्यानी या मागणीला केराची टोपली दाखवत भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर निवडून येऊन त्‍यांनाच ठेंगा दाखवणाऱ्या गोविंद गावडे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी निश्चित केली आहे. त्‍याचा निषेध म्‍हणून या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. (Sandip Nigalye Goa Election News Update)

दरम्यान, ‘स्वाभिमानी प्रियोळकार’तर्फे भाजपचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले संदीप निगळ्ये यांना या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असून ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. या पत्रकार परिषदेला संदीप निगळ्ये यांच्यासमवेत प्रियोळ मतदारसंघातील (Priol Constituency) भाजपचे आजी-माजी अध्यक्ष, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी पक्षातील अनागोंदी पाहून या पक्षाचा त्याग केल्याचे महेश शिलकर म्हणाले. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यानंतर भाजपमध्ये कोणताच राम राहिलेला नाही. पं. दीनदयाळ उपाध्याय यांची तत्वे व मूल्ये खुंटीला टांगून ठेवली आहेत. आतापर्यंत प्रियोळातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बाबतीत पक्षाचा आदेश मानला. आताही आम्ही मतदारसंघाबाहेरील नव्हे तर स्थानिक उमेदवार देण्याची मागणी केली, पण ती धुडकावून लावली. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा देऊन निषेध कल्याचे शिलकर म्हणाले.

दरम्‍यान, शिवाजी गावडे, काशिनाथ गावडे, गजानन प्रभुगावकर, सतीश मडकईकर यांनीही विचार मांडले. इतर पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला तर तो नक्कीच स्वीकारू असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. प्रियोळ मतदारसंघातील मतदार आणि कार्यकते हेच माझे बळ आहे. एवढी वर्षे भाजपमध्‍ये (BJP) प्रामाणिकपणे काम केले, पण त्‍याची परतफेड अशी करण्‍यात आली. मी स्थानिक असून प्रियोळमधील नागरिकांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे बहुमत निश्चित आहे, असेही निगळ्ये म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT