Khandepar Bridge Dainik Gomantak
गोवा

Khandepar: पुलावर रेती आली कुठून? खांडेपारमध्ये अपघातास निमंत्रण; रात्री चोरट्या वाहतूकीची शंका

Khandepar Bridge: खांडेपारच्या नवीन पुलावर ट्रकमधून रेतीचा ढिगारा कोसळल्यामुळे दोन दुचाकीस्वारांना अपघात झाला. केवळ सुदैव म्हणून हे दुचाकीस्वार बालंबाल बचावले.

गोमन्तक डिजिटल टीम

Khandepar Bridge Accident

पाळी: खांडेपारच्या नवीन पुलावर ट्रकमधून रेतीचा ढिगारा कोसळल्यामुळे दोन दुचाकीस्वारांना अपघात झाला. केवळ सुदैव म्हणून हे दुचाकीस्वार बालंबाल बचावले. रात्रीच्या वेळी हा रेतीचा ढिगारा एखाद्या ट्रकमधून वाहतूक करताना कोसळला असावा, असा कयास व्यक्त करण्यात येत असून या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार पडता पडता वाचले. तरीही दोन दुचाकीस्वार रस्त्यावर आडवे झाले, पण किरकोळ जखमांवर ते बचावले.

दरम्यान, रात्रीच्यावेळेला रेतीची चोरटी वाहतूक सुरू असून हे रेती नेमकी येते कुठून असा सवाल केला जात आहे. खांडेपारच्या नवीन पुलावर दोन दिवसांपूर्वी अचानक रेतीचा ढिगारा दिसल्यामुळे वाहनचालक गोंधळले. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. चौपदरी पूल असल्याने वाहने वेगात असतात,अचानक समोर रेतीचा ढिगारा दिसल्याने दुचाकीस्वार गोंधळले या ढिगाऱ्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला होता, पण दुचाकीस्वार थोडक्यात बचावले.

रेतीची वाहतूक कुठून केली जाते?

सध्या रेती उत्खननाला बंदी आहे, तरीपण रात्रीच्या वेळेला रेतीची वाहतूक बिनधास्तपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्रीच्यावेळेला सुरक्षा यंत्रणेला व्यवस्थित हाताळून ही रेती वाहतूक होत आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असा प्रकार सध्या सुरू आहे, तरीपण नवीन खांडेपार पुलावरून वाहतूक होणारी रेती कुठून येते, असा सवाल केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT