Vasco Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: कानात इअरफोन लावून चालला रुळावरून, रेल्वेने दिली धडक; झारखंडच्या तरुणाचा सांकवाळ येथे मृत्यू

Goa Accidental Deaths: पहिल्‍या अपघाताबाबत वास्को रेल्वे पोलिसांनी सांगितले की, ही घटना सकाळी ८ वाजता कासावली आणि सांकवाळ यादरम्यान घडली. रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

Sameer Panditrao

वास्को: सांकवाळ येथे सोमवारी अरुण होरो (२३, मूळ झारखंड) हा युवक रुळावरून इअरफोन लावून चालत असताना रेल्‍वेने धडक दिल्‍याने जागीच ठार झाला. तर, मुरगाव बंदराकडे झालेल्‍या दुसऱ्या एका स्‍वयंअपघातात दुचाकीस्‍वार सत्यम पटेल (२३, मूळ उत्तरप्रदेश) याचा मृत्‍यू झाला.

पहिल्‍या अपघाताबाबत वास्को रेल्वे पोलिसांनी सांगितले की, ही घटना सकाळी ८ वाजता कासावली आणि सांकवाळ यादरम्यान घडली. इअरफोन लावून रुळावरून चालत असताना रेल्‍वेचा आवाज आला नाही आणि धडक बसल्‍याने अरुण होरो हा मृत्युमुखी पडला.

रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्‍हा अरुण हा रुळाच्या बाजूला पडलेला आढळला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्‍हणून नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दुसरा अपघात मुरगाव बंदराच्या फाटक क्रमांक नऊसमोर काल रविवारी सायंकाळी पाचच्‍या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेशाचे परंतु कामानिमित्त नवेवाडे येथे राहणारे सत्यम व सर्वेश हे दोघे काल सायंकाळी बायणातील रवींद्र भवनासमोरच्या रस्त्याने मुरगाव बंदराच्या फाटक क्रमांक नऊकडे स्कूटरने चालले होते. सत्यम हा स्कूटर चालवत होता.

मात्र त्‍याचा दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथे सत्यमला मृत घोषित करण्यात आले. सर्वेशवर उपचार सुरू आहेत. मुरगावचे पोलिस उपनिरीक्षक सूरज नाईक पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT