Shripad Naik dainik gomantak
गोवा

Shripad Naik : मोपा, झुआरीसह ‘आयुर्वेद’चे एकाच दिवशी उद्‍घाटन

श्रीपाद नाईक : ‘पीएमओ’च्या निर्णयाची प्रतीक्षा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, नव्या झुआरी पुलाचा एक भाग तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्था या तिन्ही प्रकल्पांची तयारी पूर्ण झाली आहे. या प्रकल्पांचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्ते एकाच वेळी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन, बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

सध्या राज्यात मोपा विमानतळाचे उद्‍घाटन कधी होणार याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे. हा प्रकल्‍प कधी सुरू होणार असा प्रश्‍न केला असता नाईक म्हणाले की, पंतप्रधानांना या तिन्ही प्रकल्पांच्या उद्‍घाटनासाठी उपलब्ध असलेल्या तारखांच्या आम्‍ही प्रतीक्षेत आहोत. मोपा विमानतळच नव्हे तर झुआरी पुलाचा एक भाग पूर्ण होत आला आहे व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकल्‍पांचे उद्‍घाटन एकाच दिवशी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासंदर्भातची तारीख लवकरच निश्‍चित होईल, असेही ते म्‍हणाले.

गोव्यातील विविध गुन्ह्यांचे प्रमाण वाढीचे प्रमुख कारण ड्रग्ज हेच आहे. राज्यातून ड्रग्ज संपवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे महत्वाचे आहे. पर्यटन क्षेत्रातील सर्व बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार आणि पर्यटनमंत्र्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे.

- श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT