Sambhaji Bhide dainik gomantak
गोवा

'संभाजी भिडे गोव्यात आल्यास धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता', काँग्रेसची CM कडे मोठी मागणी

हिंदुस्तान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे वादग्रस्त आणि भडकाऊ भाषणांमुळे नेहमी चर्चेत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Sambhaji Bhide To Visit Goa: कर्नाटकातील श्रीराम सेनेचे नेते प्रमोद मुतालीक यांच्यावर जशी गोव्यात बंदी आहे, तशी महाराष्ट्रातील हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही गोव्यात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

हिंदुस्तान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे वादग्रस्त आणि भडकाऊ भाषणांमुळे नेहमी चर्चेत असतात. दवर्ली - मडगाव येथे गुरूवारी (दि. 24) भिडेंचे व्याख्यान होणार आहे.

"गोव्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांना राज्यातील सध्याच्या धार्मिक तणावाची जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबणा असो की चर्चसमोर देवीच्या पुतळ्याची स्थापना असो. यामुळे अलिकडे राज्यात धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते." असे काँग्रेसने म्हटले आहे.

"संभाजी भिडे यांना राज्यात व्याख्यानासाठी परवानगी दिल्यास येथे धार्मिक तणाव निर्माण होईल तसेच, राज्यातील शांतताही भंग होईल. भिडेंच्या भाषणामुळे धार्मिक दंगल देखील होण्याची अधिक शक्यता आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळापासून मुतालीक यांच्यावर गोव्यात येण्यास बंदी आहे. दवर्ली येथे येत्या २४ रोजी भिडे यांचे व्याख्यान होणार आहे."

"वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर महाराष्ट्रात विविध गुन्हे दाखल आहेत. देशाच्या राष्ट्रपती देखील याच काळात गोवा दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील शांतता राखण्यासाठी त्यांच्यावर गोव्यात बंदी घाला." असे काँग्रेस पक्षाने प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: आरोपांची शिडी, परतीची वाट

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT