Margao land grab case Suspect Salim Doddamani  Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणातील सूत्रधार सलीम दोडामणी अद्याप फरार

अन्य तिघांनी घेतली अटकपूर्व जामीनासाठी धाव

सुशांत कुंकळयेकर

Margao Police : मृत झालेल्या नोटरीच्या नावे बनावट शिक्के तयार करून तसेच बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करून मडगाव येथील एका वृध्द कपड्याच्या व्यापाऱ्याची दवर्ली येथील जमीन हडप करण्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील सूत्रधार सलीम दोडामणी हा अद्याप फरारी असून मडगाव पोलीस त्याच्या शोधात आहेत.

दरम्यान या प्रकरणातील अन्य तीन संशयीत राजदीप कुंडईकर, महमद इस्माईल ललनवार आणि इलियास अब्दुल धलायत या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून उद्या 15 रोजी त्यांच्या अर्जावर मडगाव सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी मडगाव पोलीसांनी मडगाव येथील एका नोटरीसह एकूण 5 जणांवर फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, महमद सालेह मुसा या मडगाव येथील कपड्याच्या व्यापाऱ्याचे दवर्ली येथील दोन प्लॉट सलीम आणी राजदीप यांनी बनावट कागदपत्रे तयार करून घेऊन बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीच्या आधारे ललनवार आणि धलायत यांना विकले.

यासाठी एका मृत नोटरीच्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली. या प्रकरणी आपल्याला अटक होईल या भितीने सध्या त्यांनी जामीन मिळावा यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT