Liquor Shop Dainik Gomantak
गोवा

Liquor Sale Ban In Goa: गोव्यात तीन दिवस दारू विक्री आणि वाहतुकीस बंदी; जाणून घ्या तारीख आणि कारण

Liquor Sale And Transport Ban In Goa: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस वाहतूक आणि विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.

Pramod Yadav

Liquor Sale And Transport Ban In Goa

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस वाहतूक आणि विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. गोवा सरकारच्या वतीने याबाबत बंदी आदेश प्रसिद्ध केला आहे.

गोव्यात येत्या 05, 06, 07 मे आणि 04 जून रोजी मद्य वाहतूक आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

गोवा सरकारच्या आदेशानुसार, राज्यात ०५ मे सायंकाळी सहानंतर ०७ मे पर्यंत तसेच, ०४ जून रोजी राज्यात मद्य विक्रीस पूर्णत: बंदी राहणार आहे. गोव्यात सात मे रोजी लोकसभेच्या दोन जागांसाठी मतदान होणार असून, चार जून रोजी मतमोजणी होणार असल्याने हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

बार आणि रेस्टॉरंट मालकाने केवळ खाद्यपदार्थांची विक्री करता येईल आणि मद्य विक्रीस बंदी असणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांना बार आणि रेस्टॉरंटच्या बाहेर केवळ खाद्यपदार्थ आणि मद्य मिळणार नाही, असा फलक लावावा लागणार आहे.

तसेच, मद्य वाहतुकीस देखील बंदी घालण्यात आली आहे. आदेशानुसार, राज्यात ०५ मे सायंकाळी सहानंतर ०७ मे पर्यंत तसेच, ०४ जून रोजी राज्यात मद्य वाहतुकीस बंदी राहणार आहे.

गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 07 मे रोजी मतदान होत आहे. तसेच, देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्यात मद्य वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT