Sanit Francis Xavier Feast Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Feast: "फाल्यां फेस्ताक या मरें?" दिवसभर मासचे आयोजन; जाणून घ्या ओल्ड गोवा चर्चचे वेळापत्रक

Mass Timings for Old Goa Church Feast: मंगळवारी, ३ डिसेंबर रोजी सेंट झेवियर यांच्या फेस्तानिमित्त पूर्ण दिवस मास आयोजित करण्यात आले आहे. त्याचे वेळापत्रक जाणून घ्या.

Akshata Chhatre

Saint Francis Xavier Feast, Basilica of Bom Jesus, Old Goa

ओल्ड गोवा: डिसेंबरचा महिना आल्यानंतर गोवेकरांसाठी सर्वात महत्वाचा दिवस ठरतो तो म्हणजे सायबाचें फेस्त. दरवर्षी ३ डिसेंबरच्या दिवशी ओल्ड गोव्यातील चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त आयोजित केले जाते. यावर्षी मात्र दहा वर्षांनी एकदा होणाऱ्या पवित्र शवप्रदर्शन सोहळाने या उत्सवाला विशेष जोड लाभली आहे. मंगळवारी, ३ डिसेंबर रोजी सेंट झेवियर यांच्या फेस्तानिमित्त पूर्णदिवस मास आयोजित करण्यात आले आहे, आणि त्याच्या वेळा खालील प्रमाणे आहेत.

मंगळवारी पहाटे चर्चमध्ये ३:४५ वाजता पहिला मास होईल, यानंतर ५:००, ६:००, ७:१५, ८:३० आणि १०:३० वाजता मास होणार आहे.

दुपारी १२:१५ वाजता इंग्रजीमधून मास होईल आणि त्यांनतर संध्याकाळी ३:३०, ५:०० आणि ६:१५ अशा वेळी धार्मिक प्रार्थना होणार आहे.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्ताच्या निमिताने व्हीलचेअर सेवा देखील पुरवली जाणार आहे, मात्र यासाठी केवळ दुपारी २:०० ते संध्याकाळी ५:०० अशी वेळेची मर्यादा असेल.

व्हीलचेअर सेवा मिळवण्यासाठी 'या' गोष्टी महत्वाच्या:

१) शवप्रदर्शन समितीने जारी केलेला पास

२) पॅरिश धर्मगुरूंकडून मिळवलेले पत्र

३) मेडिकल कार्टिफिकेट

४) अपंगत्वाचे प्रमाणपत्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT