Saint Francis Xavier Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: ‘गोंयचो सायबा’वर हिंदू भाविकांचीही श्रद्धा! पागींनी सांगितला अनुभव, म्हणाले की...

Dilip Pagi: सेंट फ्रान्सिस झेवियर यांना ‘गोंयचो सायब’ म्हणून ओळखले जात असून ते केवळ रॉमन कॅथलिक धर्मापुरते मर्यादित नसून मोठ्या संख्येने हिंदू भाविकांचीही श्रद्धा आहे, अशी माहिती दिलीप पागी यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Saint Francis Xavier Exposition 2024

तिसवाडी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांना ‘गोंयचो सायब’ म्हणून ओळखले जात असून ते केवळ रॉमन कॅथलिक धर्मापुरते मर्यादित नसून मोठ्या संख्येने हिंदू भाविकांचीही श्रद्धा आहे, अशी माहिती दिलीप पागी यांनी दिली.

पागी यांचे जुने गोवे येथे अनेक वर्षांपासून वास्तव्य असून त्यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या चमत्काराचा स्वतःहून अनुभव घेतला आहे.

पागी म्हणाले, २००४ मध्ये माझा भीषण अपघात झाला होता, आपण मृत्यूच्या दारात होतो. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टर्सनी देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. पण त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी सेंट फ्रान्सिस झेवियरकडे प्रार्थना केली. त्यामुळे मी बरा झालो. तेव्हा मानसिकरीत्या थोडा परिणाम झाला होता, परंतु सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या कृपेने बरा झालो.

३ डिसेंबरच्या फेस्ताला मोठ्या संख्येत हिंदू लोक येथे येतात. फुले आणि मेणबत्ती विक्री करणाऱ्यांमध्ये बहुतांश हिंदू धर्मातील बहुजन समाजातील लोक आहेत. त्याशिवाय अनेक जण आरोग्य, संतान यासंदर्भात नवस बोलतात.

गुरुवारपासून दर्शन सोहळा

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचे प्रदर्शन २१ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. भाविकांना २२ नोव्हेंबरपासून दर्शन घेता येईल. २१ रोजी सकाळी पार्थिव ‘से कॅथेड्रल चर्च’ येथे नेण्यात येईल. ४ जानेवारी २०२५ हा दर्शन घेण्यासाठी शेवटचा दिवस असणार असणार आहे. ५ जानेवारी रोजी पार्थिव पुन्हा बासिलिका ऑफ बॉम जिझस येथे परत आणले जाईल.

तयारी जोरात…

जुने गोवेत शवदर्शन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गांधी सर्कलजवळचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भाविकांसाठी खास पार्किंग व्यवस्था, शौचालय व्यवस्था करण्यात आली असून सोयीसाठी कालपासूनच काही ठिकाणी रस्ता बंद केला आहे. त्यामुळे कदंब पठारमार्गावरून ये-जा सुरू आहे. गवंडाळी पुलावरून येणाऱ्यासाठी पेट्रोलपंपाकडून ये-जा सुरू आहे. परंतु येत्या दोन दिवसात ही वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी फेरीची तयारीही जोरात सुरू आहे. त्यामुळे गांधी सर्कल रस्ता फक्त भाविकांसाठी खुला राहणार आहे. दोन्ही चर्च परिसरात भव्य मंडपाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. देश-विदेशातून भाविकाचे येणे सुरू झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT