Mukesh Thali Dainik Gomantak
गोवा

Mukesh Thali: कोकणी साहित्‍यीक मुकेश थळींना ‘रंगतरंग’साठी ‘साहित्‍य अकादमी’ पुरस्‍कार जाहीर

Mukesh Thali Sahitya Akadami Award: बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार, नाटककार अशी ओळख असलेले गोव्‍यातील प्रसिद्ध कोकणी साहित्‍यिक मुकेश थळी यांच्‍या ‘रंगतरंग’ या निबंधसंग्रहाला यंदाचा केंद्रीय साहित्‍य अकादमीचा पुरस्‍कार जाहीर झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Mukesh Thali Sahitya Akadami Award

मडगाव: बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार, नाटककार अशी ओळख असलेले गोव्‍यातील प्रसिद्ध कोकणी साहित्‍यिक मुकेश थळी यांच्‍या ‘रंगतरंग’ या निबंधसंग्रहाला यंदाचा केंद्रीय साहित्‍य अकादमीचा पुरस्‍कार जाहीर झाला. एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्‍ह असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे. दरम्‍यान, थळी यांच्‍यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘रंगतरंग’ हे पुस्‍तक आनंद प्रकाशनने प्रकाशित केले असून त्‍यात २० ललित निबंध आहेत. त्यात श्रावण व इतर निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, पाऊस, वैचारिक अशा विविध विषयांवरील निबंध आहेत. आशयघनतेची खोली, आकर्षक, सुटसुटीत, टोकदार, मधाळ कोकणी व साहित्यमूल्यांची अंत:प्रवाहांसहित आनंददायी पखरण हे या पुस्‍तकातील निबंधांचे गुणविशेष आहेत.

मुकेश थळी हे साहित्‍यिक असले तरी आकाशवाणी पणजी केंद्रावरून वृत्तनिवेदक म्हणून ३० वर्षे सेवा देऊन गेल्या वर्षी ते निवृत्त झाले. आपल्‍या कार्यकाळात त्‍यांनी कोकणी बातम्यांना आपल्या भारदस्त आवाजाने एक उंची दिली. तत्पूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठाच्या कोकणी विश्‍‍वकोश विभागात संशोधक साहाय्यक म्हणून सहा वर्षे सेवा दिली.

गणित विषयात पारंगत असलेले मुकेश थळी यांनी त्याच विषयात पदवी संपादन केली. त्‍यांना संगीताबद्दलही विशेष ज्ञान असून त्‍यांच्‍या साहित्‍यात त्‍यांनी आपल्‍या या संगीतप्रेमाचा मुक्‍तहस्‍ते वापर केला आहे. ‘वळेसर’, ‘हंसध्वनी’, ‘अक्षरब्रह्म’, ‘जीवनगंध’, ‘रंगतरंग’ आणि नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘शिवरंजनी’ असे त्‍यांचे सहा निबंध संग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‍याशिवाय ‘दोरेमिफा-सारेनीसा’ हे नाटकही पुस्‍तक रूपात प्रकाशित झालेले आहे.

मराठीत सुधीर रसाळ यांना पुरस्‍कार

सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या काव्यशास्त्राची प्रथमच सैद्धांतिक समीक्षा करणाऱ्या ‘विंदांचे गद्यरूप’ या मराठी भाषेतील ग्रंथासाठी ज्येष्ठ समीक्षक डॅा. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. त्‍यांच्‍या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या सोळाव्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. त्यांनी संपादित केलेली तीन पुस्तके देखील प्रकाशित आहेत. त्यांना आत्तापर्यंत २८ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

आजपर्यंत कोकणीतून मी जे साहित्‍य निर्माण केले आहे, त्‍यामागे मी या भाषेचे काहीतरी देणे लागतो ही भावना आहे. माझ्‍या साहित्‍यातून मला काय फायदा होईल याचा मी कधीच विचार केला नाही. पण माझ्‍या हातून जी कलाकृती तयार होते, ती उत्‍कृष्‍ट असावी याचा ध्‍यास मात्र नेहमीच धरला. आज माझ्‍या पुस्‍तकाला केंद्रीय साहित्‍य अकादमीचा पुरस्‍कार प्राप्‍त झाला हे ऐकून मला खचितच आनंद झाला आहे. पण त्‍याहीपेक्षा जास्‍त म्‍हणजे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे एवढेच मी म्‍हणेन.
मुकेश थळी, कोकणी साहित्‍यिक
मुकेश थळी यांचे साहित्‍य हे निखळ आनंद देणारे. त्‍यामुळे मला ते पु. ल. देशपांडे यांच्‍यासारखे आनंदयात्री साहित्‍यिक वाटतात. मी त्‍यांच्‍या साहित्‍याचा एक फॅन. त्‍यांच्‍या निबंध लेखनात साध्‍या गावातील विषयांपासून आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील विषयांचा समावेश असतो. आपल्‍या निबंधातून मुकेश कधी कधी अंतराळाचाही प्रवास करून आणतो. नुकताच डी. गुकेश हा बुद्धिबळात जागतिक विजेता बनला आणि दुसऱ्याच दिवशी मुकेशचा लेख छापून आला. त्‍यात गुकेशच्‍या बुद्धिबळाच्‍या पटावरील चाली कशा होत्‍या त्‍याचा उल्‍लेख होता. थळी यांचा विविध विषयांचा व्‍यासंग मोठा आहे.
अजित केरकर, नाटककार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT