Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी तो आला अन्..., कर्नाटकातील युवकाची पणजीत आत्महत्या

कॅसिनोत हरल्याने, गळफास घेतल्याचा पोलिसांचा संशय

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime Case: कर्नाटक येथील पर्यटक साहिल खान (25 वर्षे) याने मळा - पणजी येथील एका हॉटेलमध्ये फॅनला ट्रॅक पँटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी उघडकीस आली.

याप्रकरणी पणजी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी तो आला होता. जुगारात मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याने नैराश्‍यातून त्याने ही आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

कर्नाटकातून गोव्यात पर्यटनासाठी आलेला साहिल खान या 25 वर्षीय तरुणाने मळा-पणजी येथील हॉटेलमध्ये पंख्याला ट्रॅक पँटने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल खान हा मूळचा तुमकूर-कर्नाटक येथील असून 26 मे 2023 रोजी तो गोव्यात आला होता. त्याने मळ्यातील एका हॉटेलात 30 मेपर्यंत रूम आरक्षित केला होता. तो येताना मोठ्या प्रमाणात रक्कम आपल्या मित्रांकडून घेऊन आला होता.

आल्यापासून तो संध्याकाळी तरंगत्या कॅसिनोवर जुगार खेळण्यास जात होता व त्यानतंर रात्री उशिरा हॉटेलवर येत होता. मंगळवारी (ता.30) सकाळी तो हॉटेल सोडणार होता.

सकाळी 11 वाजले तरी तो उठत नसल्याने हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने ही बाब हॉटेल व्यवस्थापकाला सांगितली.

पणजी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर साहिल खान याच्या रूमचे दार धडक देऊन उघडण्यात आले.

पोलिसांनी रूमचे दार उघडताच आतमध्ये साहिल खान हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह त्वरित खाली उतरवण्यात आला. त्याने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी ठेवली नव्हती तसेच आत्महत्येमागील कारण लिहून ठेवले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT