Mumbai Boat Accident X
गोवा

Mumbai Boat Accident: मुंबई बोट अपघातात गोव्यातील कुटुंबावर घाला; महिलेचा दुर्दैवी मृत्यू, आठ वर्षांचा मुलगा बेपत्ता

Goa Women Death Gateway Of India Boat Accident: गेट वे ऑफ इंडिया’ येथून निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात उसकई गावातील ३७ वर्षीय सफिना पठाण या महिलेचा करुण अंत झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Mumbai Boat Accident Gateway of India

म्हापसा: ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ निष्पाप जीवांना मुकावे लागले. या दुर्घटनेत उसकई गावातील ३७ वर्षीय सफिना पठाण या महिलेचा करुण अंत झाला, तर तिचा आठ वर्षीय जोहान हा मुलगा या घटनेनंतर बेपत्ता असून त्याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बोटीवरील सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट दिले नव्हते, असा दावा पठाण कुटुंबीयांनी केला आहे. घटनेदिवशी सफिना आपल्या आठ वर्षांच्या मुलाचा हात धरून बोटीत चढली, तर तिचा पती अशरफकडे आठ महिन्यांचे बाळ होते. त्यांच्यासोबत सफिनाची बहीणही होती. यावेळी स्पीड बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली.

त्यामुळे बोट कलंडून बुडू लागली. कालांतराने प्रवाशांना लाईफ जॅकेट दिले जाऊ लागले; परंतु पठाण कुटुंबीयाला लाईफ जॅकेट मिळाले नाही. त्यातच सफिना आणि जोहानची ताटातूट झाली. जोहान अचानक गायब झाला आणि सफिनाही बुडाली.

सफिनाचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा गोव्यात आणला. शुक्रवारी (ता.२०) सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. अद्याप जोहानचा शोध लागलेला नाही, अशी माहिती पठाण कुटुंबीयांचे मित्र मझहर शेख यांनी ‘गोमन्तक’ला दिली. या दुर्घटनेचा प्रशासनाने सखोल तपास करून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

ही घटना बुधवारी (ता.१८) घडली. सफिना ही पती अशरफ आणि दोन मुले, जोहान (वय ८ वर्षे) आणि आठ महिन्यांच्या बाळासह मुंबईला मंगळवारी (ता.१७) आपल्या मुंबईतील बहिणीकडे गेली होती. बुधवारी ते हाजी अली दर्ग्याला भेट दिल्यानंतर हे कुटुंबीय नातेवाईकांसोबत प्रवासी बोटीत बसले. या बोटीची क्षमता ८० जणांची असताना यामध्ये १२० प्रवासी भरले होते, अशी कैफियत मृतांच्या कुटुंबीयांनी मांडली.

आठ महिन्यांचे बालक बचावले

बोटीच्या पहिल्या डेकवर असलेल्या अशरफला पोहायला येत नव्हते. बोट बुडू लागल्याने अशरफच्या नाकापर्यंत पाणी आले. त्याने आपल्याकडील आठ महिन्यांचे मूल एका विदेशी नागरिकाकडे सोपविले. पोहता येत नसल्याने अशरफने कसाबसा एका बॅरेलला पकडून स्वतःचा जीव वाचविला. या काळात दोनवेळा अशरफने पाण्यात गटांगळ्या खाल्ल्या; परंतु दैव बलवत्तर म्हणून बचाव पथकाने अशरफला पाण्याबाहेर काढले. तसेच विदेशी पर्यटकामुळे इवल्याशा बालकाचा जीव वाचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT