Curtorim constituency  Dainik Gomantak
गोवा

Sadanand Tanavade : नावेली पाठोपाठ कुडतरी सर करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

आमदार उल्हास तुयेकर यांना विश्वास : जास्तीतजास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

मडगाव : लोकोपयोगी कामाद्वारे लोकांपर्यंत पोहचत भाजपने पहील्यांदाच नावेली सर केली. आता तोच फॉर्म्युला कुडतरी मतदारसंघात वापरला जाणार असल्याचे नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने जी विकासकामे केली आहेत.

(Sadanand Tanavade said BJP's victory in Curtorim constituency is certain)

त्यामुळे गोव्यातील 40 ही मतदारसघांत भाजप पक्षाचा जनाधार वाढत असून यावेळी जे नावेलीत झाले तेच पुढच्या निवडणुकीत कुडतरीत होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुडतरी भाजप मंडळाने सेवा पखवाडा कार्यक्रमाअंतर्गत या मतदारसंघात स्वच्छता मोहीम घडवून आणली होती. या मोहिमेत भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी भाग घेतला. कुडतरी मतदारसघांत अँथनी बार्बोजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले काम कौतुकास्पद असून त्यामुळे मतदासंघांत भाजप पक्षाला अधिक पाठिंबा मिळेल असे ते म्हणाले.

यावेळी स्थानिक आरोग्याधिकारी डॉ. वल्लभ नाडकर्णी यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करताना अशा कार्यक्रमांना आपले पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासन दिले. यावेळी भाजप नेते सर्वानंद भगत, शर्मद रायतुरकर, नवीन रायकर, उर्फान मुल्ला स्थानिक मंडळाचे पदाधिकारी डॉ. स्नेहा भागवत, अँथनी बार्बोजा, नीळकंठ एकावडे, मेहबूब मकांदर, धीरज शेट, क्लेमेंत डायस, बबिता बोरकर, ज्योती नाईक व अन्य कार्यकर्ते उपस्थीत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Goa Accidents: दक्षिणेतील अपघाती मृत्यूत 84 टक्के घट; वाहतूक विभाग उपअधीक्षक प्रभुदेसाई यांची माहिती

Gajalakshmi Rajyog: सुखाचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगामुळे 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार अमाप संपत्ती आणि मानसन्मान

SCROLL FOR NEXT