Margao Shop Caught Fire News Dainik Gomantak
गोवा

Margao Fire News: मडगावात स्टेशनरी दुकान खाक

Margao Shop Caught Fire News: मोठी वित्तहानी : सर्व साहित्‍य जळाले; जवळच्‍या दुकानालाही बसली झळ

दैनिक गोमन्तक

Fire At Madgaon Shop News:

मडगावातील एका स्टेशनरी दुकानाला आज बुधवारी पहाटे पाचच्‍या सुमारास आग लागली. त्‍यात संपूर्ण दुकान जळून खाक झाले. जवळच्‍या दुकानालाही आगीच झळ बसली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्‍याचे समजते. सज्जन नाईक यांच्या मालकीचे हे दुकान आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, लोयोला हायस्कूलच्या मागे हे गिफ्‍ट-कम स्‍टेशनरीचे दुकान आहे. आगीत दुकानातील सर्व साहित्‍य जळून खाक झाले.

माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाने घटनास्‍थळी तातडीने धाव घेतली, पण दुकानाचे शटर बंद होते. त्यामुळे मालक येईपर्यंत दलाला थांबावे लागले. नंतर दुकानाचे शटर उघडले असता वारा आत घुसल्‍याने आग अधिकच फैलावली व दुकान आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडले.

ही आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही, असे अग्निशमन दलाचे प्रमुख गिल सौझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT