गोवा

Republic Day 2024: दिल्लीतील ‘भारत पर्व’मध्ये गोव्याचा चित्ररथ

Republic Day 2023: 50 टक्के काम पूर्ण : ‘विकसित गोवा स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पना; सुशांत खेडेकर यांच्याकडे जबाबदारी

दैनिक गोमन्तक

Republic Day 2023: गोव्याचा चित्ररथ दिल्लीतील ‘भारत पर्व’मध्ये मांडण्यात येणार असल्याने तो चित्ररथ उभारण्यासाठी 40 जणांनी राष्ट्रीय रंग शाळा शिबिरानजीक काम सुरू केले आहे. यंदा चित्ररथ करण्याचे काम सुशांत खेडेकर यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे.

चित्ररथ आराखडा निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

दिल्लीत कर्तव्यपथावर प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनासाठी गोव्याच्या चित्ररथाची निवड झालेली नाही. मात्र, 23 ते 31 जानेवारीदरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भरणाऱ्या ‘भारत पर्व’ या प्रदर्शनात गोव्याचा चित्ररथ प्रदर्शित केला जाणार आहे. त्यासाठी चित्ररथ तयार करणे आता सुरू केलेले आहे. ‘विकसित गोवा स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेवर आधारित यंदा गोव्याचा चित्ररथ आहे.

विविध कलाप्रकारांचे सादरीकरण

गोव्यासह आसाम, कर्नाटक, उत्तराखंड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचे चित्ररथ ‘भारत पर्व’मध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. त्या ठिकाणी या चित्ररथांव्यतिरिक्त हस्त कारागीर मेळावा, लोककलांचे प्रदर्शन, आदिवासी नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आदी सादर केले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT