Sachin Tendulkar in Goa Dainik Gomantak
गोवा

Sachin Tendulkar in Goa VIDEO : सचिनची रोड ट्रीप; ‘चाय पे चर्चा’ अन्‌ सेल्फीही!

Sachin Tendulkar in Goa : अर्जुनसाठी गोवा टूर; मडगावात युवा खेळाडूंनाही केले मार्गदर्शन

दैनिक गोमन्तक

Sachin Tendulkar in Goa : ‘गोवा-बेळगाव एक्स्प्रेस-वे’वर चहा पीत असतानाचा एक व्हिडिओ मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने शेअर केला आहे. यावेळी त्याने काही स्थानिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एका विद्यार्थिनीची विशेष विचारपूस करत तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला. (Sachin Tendulkar in Goa)

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा गोवा रणजी क्रिकेट संघाकडून खेळत आहे. एरवी विमानाने फिरणारा सचिन एका सराव शिबिरासाठी आपल्या मुलासोबत बुधवारी बेळगावमार्गे गोव्यात कारने आला. तेव्हा एके ठिकाणी ‘टी ब्रेक’ घेत सचिनने काही सेकंदांचा एक व्हिडिओ तयार केला.

चहासोबत ‘टोस्ट’ खाण्याचा आनंद काही औरच. ‘एक चुस्का तो बनता है...’, असे सांगत त्याने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, सचिनने शेअर केल्यानंतर हा व्हििडओ क्षणार्धात तो गोव्‍यासह महाराष्‍ट्र, कर्नाटकात व्हायरल झाला. त्‍यानंतर सोशल मीडियावर सचिनची चर्चा दिसून आली.

सब कुछ ब्लॅक...

सचिन बेळगाव-गोवा महामार्गावर काळ्या कारसह काळा टी शर्ट, काळी पॅन्ट, काळी चप्पल आणि काळ्या चष्‍म्‍यासह तो दिसून आला. आता या काळ्या रंगाचे रहस्य उलगडण्यासाठी त्याचे चाहते कामाला लागले आहेत. चाहत्यांनी समाजमाध्यमांवर तशा प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत.

इथे व्हिडिओ पाहा :

बहुमोल टिप्स

उपलब्‍ध माहितीनुसार, सचिन तेंडुलकरने दि. 1 व 2 नोव्‍हेंबरला मडगाव येथील डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर तीन दिवसांच्या सराव शिबिरात गोवा संघातील क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले. त्याने खेळाडूंना दिलेल्या टिप्स किती फायदेशीर ठरतात ते यंदाच्या मोसमातील उर्वरित सामन्यांत दिसून येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT