Sachin Tendulkar in Goa Dainik Gomantak
गोवा

Sachin Tendulkar in Goa: गोव्यात सचिन तेंडुलकरची फुल-टू धमाल, मासे पकडतानाचा शेअर केला Video

Sachin Tendulkar in Goa: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) गोव्यात धमाल करत आहे.

Puja Bonkile

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) गोवा दाैऱ्यावरुन आहे. तो सोशल मिडियावर तेथील अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यासाठी शेअर करत आहे. कधी तो गोवन बन्सचा अस्वाद घेतांना दिसत आहे तर कधी गोवा-बेळगाव एक्स्प्रेस-वे’वर चहा पीत असतानाचा एक व्हिडिओ  शेअर केला आहे. त्याने अलिकडेच एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कोळ्यासह मासेमारी करतांना दिसत आहे. सचिनचा हा व्हिडिओ काही क्षणांत सोशल मिडियावर व्हायरला झाला आहे.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या व्हिडिओमध्ये गोव्यातील (Goa) किनाऱ्यावर मासेमारी करतांना दिसत आहे.व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले," गोव्यातील मासेमारी बंधुसह एक मनोरंजक सकाळ". सचिनने जांभळ्या रंगाचा टि-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घालून दिसत आहे. तसेच सी-फूडचा अस्वाद घेतांना दिसत आहे.

दरम्यान, पणजीतील एका हॉटेलमध्ये सचिनने नाश्ता केला. केळ्यापासून बनविलेले बन्स मला खूप आवडले, असे सचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.सचिनचा हा व्हिडिओ काही क्षणांत समाजमाध्यमावर व्हायरला झाला. गोमंतकीय खाद्यपदार्थांचा मी आज आनंद घेतल्याचे त्याने सांगितले.

तसेच काही दिवसांपुर्वी ‘गोवा-बेळगाव एक्स्प्रेस-वे’वर चहा पीत असतानाचा एक व्हिडिओ (Video) मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने शेअर केला होता. यावेळी त्याने काही स्थानिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एका विद्यार्थिनीची विशेष विचारपूस करत तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT