गोवा

Russian Dj Arrested: धक्कादायक! गोव्यात पहिल्यांदाच GHB Drugs जप्त, रशियन Dj महिलेला अटक

Goa Crime News : डीजे रशियन महिलेला अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने केरी-पेडणे येथे तिच्या फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यात तिच्या फ्लॅटमधून गामा हायड्रो बुटायरेट (जीएचबी) हा नव्या प्रकारचा ड्रग्ज तसेच गांजा मिळून सुमारे १७ लाख रुपये किमतीचा अमलीपदार्थ जप्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Querim Russian Dj Woman Arrested GHB Drugs in Goa

पणजी: गेली अनेक वर्षे किनारपट्टी भागात संगीत पार्ट्या तसेच काही हॉटेलमध्ये संगीत वाचविणाऱ्या डीजे रशियन महिलेला अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने केरी-पेडणे येथे तिच्या फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यात तिच्या फ्लॅटमधून गामा हायड्रो बुटायरेट (जीएचबी) हा नव्या प्रकारचा ड्रग्ज तसेच गांजा मिळून सुमारे १७ लाख रुपये किमतीचा अमलीपदार्थ जप्त केला.

ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून तिला पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संशयित रशियन महिला ही गेली अनेक वर्षे गोव्यात पर्यटन व्हिसावर वास्तव्यास आहे.

कारवाई तीव्र

आतापर्यंत अमलीपदार्थविरोधी कक्षाने यावर्षी १५ हून अधिक प्रकरणे नोंदवून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला आहे. देशी तसेच विदेशी ड्रग्ज विक्रेत्यांना अटक करत ही कारवाई आगामी पर्यटन मोसमात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती या कक्षाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT