Russian Died In Goa Dainik Gomantak
गोवा

Russian Died In Goa: त्याने मदतीसाठी आवाज दिला पण...; गोव्यात रशियन पर्यटकाचा मृत्यू

Russian Tourist Death Goa: सोमवारी (24 जानेवारी) पहाटे येथील एका खाजगी अपार्टमेंट राहत असलेल्या रशियन पर्यटकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

Manish Jadhav

Russian Tourist Found Dead in Mandrem Goa

मोरजी: सावंतवाडा, मांद्रे येथून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (24 जानेवारी) पहाटे येथील एका खाजगी अपार्टमेंट राहत असलेल्या रशियन पर्यटकाचा दुर्देवी मृत्यू झाला. सर्गेई ब्रॉडस्की, असे या 38 वर्षीय रशियन पर्यटकाचे नाव आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सावंतवाडा येथे राहत असलेला रशियन पर्यटन ब्रॉडस्की सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर चढला होता. त्या ठिकाणी काम करत असतानाच तो कोसळून झाडावर पडला, ज्यामध्ये त्याची कंबर मोडली. त्याने आरडा-आरोड केली असता त्या परिसरात राहणारा एक व्यक्ती तात्काळ त्याच्या मदतीसाठी धावून आला. त्याने तडक 108 नंबरला कॉल करुन रुग्णवाहिका बोलावली. पीडिताला रुग्णवाहिकेने तुये येथील रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आले, मात्र त्या आगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मांद्रे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले.

दुचाकीवरुन जाणाऱ्या रशियन नागरिकाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी, कोरगाव-भटावाडीत झालेल्या दुचाकीच्या अपघातात रशियन पीटर (52) याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. हरमलहून चोपडेच्या दिशेने जाताना त्याची दुचाकी घराच्या संरक्षक कठड्याला धडकली, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, उपचारासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT