Goa arrest Dainik gomantak
गोवा

Pernem Crime: पेडण्यातील सातेरी मंदिराजवळ पोलिसांचं 'ऑपरेशन', रशियन नागरिकाला अटक

Russian National Arrested In Goa: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रशियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

Pramod Yadav

पेडणे: अमली पदार्थ गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी रशियन नागरिकाला अटक केली आहे. बुधवारी (१४ ऑगस्ट) पेडणे तालुक्यातील सातेरी मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक, पणजी गोवा यांच्या वतीने मराठावाडा, मांद्रे येथील सातेरी मंदिराजवळ छापा टाकला.

पथकाने ४२ वर्षीय रशियन नागरिक कोंस्टाटीन मार्जर्ली याला गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे दोन प्रकारचे अमली पदार्थ आढळून आले. २९ व ५०० ग्रॅम वजनाचा एक लाख ६६ हजार किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत रशियन नागरिकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. संशयित रशियन नागरिक सध्या अटकेत असून, पोलिस निरीक्षक सुनील फालकर अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT