Salcete Panchayat Election  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: सासष्टीत पंचायत उमेदवारी अर्ज भरण्यास झुंबड

चौथ्या दिवशी 177 अर्ज: एकूण अर्ज पोहोचले 341वर

दैनिक गोमन्तक

मडगाव: लोकसंख्येच्या दृष्ट्या सर्वात मोठा तालुका असलेल्या सासष्टी तालुक्यातील 33 पंचयतीच्या होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास आज मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा प्रशासकीय मुख्यालयात उमेदवारांची झुंबड उडाली होती. (Rush to fill Salcete Panchayat candidature form )

या तालुक्यातील निवडणुकीसाठी एकूण तीन निर्वाचन अधिकारी नियुक्त करण्यात आलेले असून आज चौथ्या दिवशी त्यांच्यासमोर एकूण 177 उमेदवारी अर्ज सादर झाले. मागच्या चार दिवसात उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या 321 वर पोहोचली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी चार दिवस बाकी आहेत. या तालुक्यातील 33 पंचायती अंतर्गत 277 प्रभाग येत असून 14 ओबीसीना, 17 एसटीना तर 1 प्रभाग एससीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

विधवा प्रथा बंदसाठी कायदा करा - आमदार युरी आलेमाव

मडगाव: महिलांना समान अधिकार देण्याबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. गोव्यातील अनेक ग्रामपंचायतींनी राज्यातील विधवा भेदभावाच्या अन्यायकारक प्रथांच्या विरोधात ठराव पारित केले आहेत.

मी गोवा सरकारला विधवा भेदभावाच्या अन्यायकारक प्रथा बंद करण्यासाठी कायदा आणण्यासह पावले उचलण्याची विनंती केली आहे. गोवा विधानसभेत शुक्रवार, 22 जुलै रोजी या विषयावरील सदर लक्षवेधी सुचना सभापतींनी कामकाजात दाखल करुन घेतल्यास चर्चेस येणार आहे. असे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT