Diwali 2023
Diwali 2023  Dainik Gomantak
गोवा

Diwali 2023 : ‘ग्रामीण दिवाळी’ची संकल्पना साखळी शहरात ठरली यशस्‍वी ; मुख्‍यमंत्र्यांची उपस्‍थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Diwali 2023 : साखळी, गावांचे होत असलेले शहरीकरण आणि आधुनिकीकरण यामुळे संस्कृती कुठे तरी हरवत चालली आहे असा भास सर्वत्र होत असतानाच साखळीतील हाऊसिंगबोर्ड कॉलनी येथे एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला अन् तो यशस्वीही ठरला.

ग्रामीण भागात ज्याप्रमाणे एकत्रित येऊन पोहे खाण्याचा व प्रेम वाटण्याचा कार्यक्रम परंपरेनुसार होतो, त्याचप्रमाणे साखळी हाऊसिंगबोर्ड कॉलनीतील सर्व नागरिकांनी एकत्रित श्री महालक्ष्मी मंदिरात एकत्रित येऊन पोहे खात दिवाळी सणाचा आनंद लुटला.

स्थानिक नगरसेविका तथा या कॉलनी समितीच्या सचिव सिद्धी प्रभू यांनी ही संकल्पना कॉलनीचे अध्यक्ष संतोष भगत यांच्याकडे मांडली. भगत यांनी त्यास पाठिंबा देताच सिद्धी यांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी मेहनत घेतली. हा प्रयोग यशस्वी झाला आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटुंबासह सहभाग घेऊन सर्वांसमवेत पोहे खाण्याचा आस्वाद घेतला.

हाऊसिंगबोर्ड येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सर्वांनी एकत्रित जमायचे ठरले. या खास सोहळ्यात कॉलनीतील सर्वजण सहभागी झाले. कॉलनीचे चार भाग करून त्यांना पोहे, उसळ व इतर फराळातील जिन्नस तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याप्रमाणे सर्वांनी आपापल्या जबाबदारीत असलेले जिन्नस मंदिरात ठरलेल्या वेळी आणले.

हाऊसिंगबोर्ड कॉलनीचा स्तुत्य उपक्रम

शहरीकरण असो किंवा आधुनिकीकरण, आपल्या संस्कृतीशी आपले नाते तोडू नये. सर्व गोमंतकीय सणांमध्ये संस्कृती व परंपरा भरलेली आहे. पुढच्या पिढीपर्यंत आपले उत्सव व त्यातील परंपरा, संस्कृती पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे.

त्यासाठी हाऊसिंगबोर्ड येथे आयोजित हा स्तुत्य उपक्रम आहे. अशाच उपक्रमांमधून नवीन पिढीला संस्कृती व परंपरा जतनाची प्रेरणा देऊया, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

Panjim: आश्‍‍चर्य! पणजीत एकही नाही धोकादायक इमारत, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा दावा

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: म्हापसामध्ये FDA ची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

SCROLL FOR NEXT