Rupa Parkar Murder Case  Dainik Gomantak
गोवा

रूपा पारकर खून प्रकरण! चोरलेल्या दागिन्यांतून आरोपी हुसेनने फेडले कर्ज

Rupa Parkar Murder Case : सदर खून चोरीच्या उद्देशाने केला होता हे स्पष्ट झाले असून रुपा हिच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने हुसेन याने कुडचडे येथील मुथुट फायनान्स मध्ये गहाण ठेवून आपले काही कर्ज फेडले

दैनिक गोमन्तक

केपे : करमणे सावर्डे येथील रूपा सुधाकर पारकर या महिलेच्या खून प्रकरणी कुडचडे पोलिसांनी मूळ दांडेली (कर्नाटका), सध्या काकोडा कुडचडे येथे राहणारा हुसेन कासीम खान (40) या युवकाला अटक केली आहे.

सदर खून चोरीच्या उद्देशाने केला होता हे स्पष्ट झाले असून रुपा हिच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने हुसेन याने कुडचडे येथील मुथुट फायनान्स मध्ये गहाण ठेवून आपले काही कर्ज फेडले तर बाकीच्या पैशातून एक दुचाकी सुद्धा विकत घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Rupa Parkar murder case Accused Hussein pays off debts stolen from jewelry from her)

5 मे रोजी रूपा हिचा खून करून गांधीनगर सावर्डे येथील मुख्य रस्त्याच्या शेजारी आड रस्त्यावर फेकून देण्यात आला होता. तो मृतदेह दुसऱ्या दिवशी 6 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास दृष्टीस पडल्याने कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला.

रूपा हिचा मृत्यू डोक्यावर गंभीर वार झाल्याने झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाल्याने कुडचडे पोलिसांनी त्यादृष्टीने तपस करण्यास सुरुवात केली होती. खुनाविषयी कोणतेच धागेदोरे सापडत नसल्याने पोलिसांसमोर या खुनाचा तपास लावणे बरेच कठीण बनले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT