Netravalim Forest Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘फलोत्पादन’ने काकडी फेकल्याची अफवाच

Goa News: चंद्रहास देसाई: महिन्याभरात 4 कोटींची भाजी बेळगावला पाठवली

दैनिक गोमन्तक

Goa News: सांगे भागात एका बंद खाणीत फलोत्पादन महामंडळाद्वारे काकडी फेकली गेली, असे जे सांगण्यात येते ती निव्वळ अफवा असून फलोत्पादन महामंडळाद्वारे अशा प्रकारे कोणत्याच भाजीची नासाडी केली जात नाही.

आमच्याकडे अधिक प्रमाणात भाजीचे उत्पादन असल्यास आम्ही ते बेळगावला पाठवतो, असे फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. दरम्यान देसाई म्हणाले, चतुर्थी दरम्यान व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी घेतलेली ही काकडी असू शकते. काकडी अधिक काळ राहिल्यास तिची चव बदलते तिच्यात कापूस धरतो. आमच्याकडे अधिक प्रमाणात जर काकडी आल्यास आम्ही ती बेळगावला विक्रीसाठी पाठवतो.

मागील महिन्याभरात अंदाजे ३० ते ४० टन काकडी आम्ही बेळगावला पाठविली आहे, त्यामुळे हा प्रकार महामंडळाकडून झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. भाजी हे ओले आणि नाशवंत उत्पादन असल्याने काही प्रमाणात खराब होऊ शकते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात ते खराब होऊ शकत नाही, त्यामुळे ती काकडी फलोत्पादन महामंडळाची नाही, एवढे आपण सांगू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

भाजी उत्पादकांना निश्‍चित हमीभाव!

गोवा फलोत्पादन महामंडळाद्वारे भाजीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना निश्‍चित हमीभाव दिला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाला निश्‍चित दर मिळण्याची खात्री होते. तसेच भाजी विकताना बाजारातील त्या उत्पादनाच्या सर्वात निचांकी दरात ती विकली जाते. मागील महिन्याभरात काकडीसह इतर भाज्या धरून एकूण 1688 टन म्हणजेच 4 कोटींची भाजी बेळगावला निर्यात करण्यात आली आहे,असे चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT