People standing in a queue outside District Hospital for RTPCR Test 

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यातील आझिलो हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

दवाखान्याबहेर चाचणी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: गोवा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय अर्थातच आझिलो हॉस्पिटलमध्ये प्रवेश करणार्‍यांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. परिणामी दवाखान्याबहेर चाचणी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत. याचा त्रास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होत आहे. कोरोना लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेऊनही चाचणीची सक्ती का केली जात आहे, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

बुधवार पासून ही चाचणी सेवा सुरू करण्यात आली आहे. ओपीडीसाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. बार्देश तालुक्यापासून जवळच्या तालुक्यातून आलेल्या रुग्णांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही वयस्क रुग्ण सकाळी लवकर तपासणीसाठी येतात. पण ही कोरोना चाचणी सक्तीची केल्याने त्यांचीही गैरसोय झाली आहे.

जिल्हा हॉस्पिटलमध्ये (District Hospital) येणार्‍या सर्व रुग्णांनी ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोका लक्षात घेता, नोंदणी करण्यापूर्वी त्यांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करावी, असा निर्देश आरोग्य संचालकांकडून देण्यात आला आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या अधिकार्‍यांनी दिली. चाचणी अनिवार्य केल्यामुळे हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांतही गोंधळ निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT