Romi Konkani Global Konknni Forum Dainik Gomantak
गोवा

Romi Konkani: रोमी कोकणीलाही सरकारी मान्यता हवी; ग्लोबल कोकणी फोरम

Konkani In Roman Script: फसवणूक झाल्याचा दावा; न्यायालयात जाण्याची तयारी

गोमन्तक डिजिटल टीम

कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळून ३६ वर्षे पूर्ण झाली; परंतु कोकणीतील रोमी लिपीला अजूनही राजमान्यता प्राप्त झालेली नाही. आमचा देवनागरीला विरोध नाही; परंतु रोमी लिपीत लिहिण्यात येणाऱ्या कोकणीलादेखील सरकार मान्यता मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे ग्लोबल कोकणी फोरमचे उपाध्यक्ष डॉमनिक फर्नांडिस यांनी सांगितले.

दाल्गाद कोकणी अकादमीच्या कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला फोरमचे अध्यक्ष कॅनडी अल्फान्सो, लुईस मास्कारेन्हस, जोस साल्वादोर फर्नांडिस आदी उपस्थित होते. फर्नांडिस यांनी सांगितले की, रोमी लिपीला भविष्यात मानाचे स्थान देण्यात येईल असे वाचन दिले होते; परंतु तसे काही झाले नाही.

आम्हाला फसविण्यात आले. कोकणी राजभाषेच्या मसुद्यात ‘कोकणी प्रजेचो आवाज’च्या पुढाऱ्यांनी रोमीलाही स्थान देणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. रोमी आणि देवनागरी असे आमच्यात दोन वाटे झाले. अनेकजण रोमीतून पुस्तके प्रकाशित करतात; परंतु त्यांना शासकीय मदत मिळत नाही.

विधानसभेतील १४ अल्पसंख्याक आमदारांना विनंती करतो त्यांनी रोमी लिपीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपला पाठिंबा द्यावा, असे कॅनडी आफान्सो यांनी सांगितले.

रोमी लिपीसाठी ही पावले उचलणार

रोमी लिपीतील कोकणीला मानाचे स्थान देण्यासाठी मुख्यमंत्री, आमदार तसेच खासदारांना निवेदन देणार.

केंद्रीय अल्पसंख्याक आयुक्तालय अल्पसंख्याकांनी आपली भाषा, लिपी, सांभाळण्याचा हक्क देते. त्यामुळे अल्पसंख्याक आयुक्तालयाकडे दाद मागणार.

राज्यातील प्रत्येक गावात रोमी लिपीप्रेमींना सभासद करणार.

रोमी लिपीतील कोकणीला जर राजभाषा कायद्यात समाविष्ट केले नाही तर सर्वोच्च न्यायालयात देखील जाण्याची तयारी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT