Colvale Jail Drug Case Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: ‘कोलवाळ’मध्ये रोलिंग पेपर्स; जेलगार्ड निलंबित

या रोलिंग पेपर्सचा वापर हा तंबाखू, चरस, गांजा आदी पदार्थ ओढण्यासाठी केला जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Jail Drug Case: म्हापसा येथील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात आज जेलगार्डला रोलिंग पेपर्सची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी जेलगार्ड समीर मोटे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, या रोलिंग पेपर्सचा वापर हा तंबाखू, चरस, गांजा आदी पदार्थ ओढण्यासाठी केला जातो. कारागृहात ड्युटीसाठी प्रवेश करण्याच्या तयारीत असताना सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षकांनी मोटे याची तपासणी केली.

यात त्याच्याकडे रोलिंग पेपर्स आढळले. मोटे याच्यावर यापूर्वी अशाच एका प्रकरणात कारवाई झाली होती. कैद्यांना अंमलीपदार्थ तसेच मोबाईलचा पुरवठा केल्याच्या आरोप त्याच्यावर होता. त्यावेळी त्याला निलंबित केले होते. आता या जेलगार्डचे दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे.

दरम्यान, कोलवाळ कारागृहात गत दहा दिवसांत दोन वेळेस छापा टाकून कैद्यांकडून एकूण तब्बल 35 मोबाईल संच, ब्लूटूथ, तंबाखू, सिगरेट्स तसेच अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. या सर्व प्रकारांमुळे येथील कारागृहाची सुरक्षा व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, हेच अधोरेखीत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT